आज महागाईच एवढी वाढलीय की कारच्या किंमती पाच लाखांपासून सुरु झाल्या आहेत. यामुळे कंपन्यांनी देखील सहा ते १० लाखांत छोट्या एसयुव्ही, हॅचबॅक लाँच केल्या आहेत. तसे पहायला गेले तर आपल्याला दोन चारच कार आठवतात ज्या परवडणाऱ्या बजेटमध्ये आहेत. परंतू, तसे नाहीय आज भारतीय बाजारात दोन चार नाही तर २६ च्या आसपास बजेटमधील कार आहेत.
तुमचे बजेट दहा लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही आज एसयुव्ही देखील घेऊ शकणार आहात. यामध्ये कॉ़म्पॅक्ट एसयुव्ही, कॉम्पॅक्ट सेदान आणि हॅचबॅक कार आहेत. मारुतीच्या अल्टो पासून ते नेक्सॉनपर्यंत या कार आहेत. या कारची विक्रीही जोरात सुरु असते. सध्या हॅचबॅक आणि सेदान कारला थोडे थंड दिवस आले असले तरी कॉम्पॅक्ट एसयुव्हीला चांगलेच दिवस आले आहेत. अनेकजण त्यांच्याकडील कार अपग्रेड करत असल्याने बाजाराचा कल थोडासा बदलू लागला आहे.
चला पाहुयात १० लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 11 पॉपुलर एसयूवींची लिस्ट...
महिंद्रा थार किंमत 9.99 लाख रुपयांपासूनटाटा नेक्सॉन किंमत 7.80 लाख रुपयांपासूनटाटा पंच किंमत 6 लाख ते 9.54 लाख रुपयांपासूनमारुती ब्रेझा किंमत 8.19 लाख रुपयांपासूनमहिंद्रा बोलेरोची सुरूवात 9.53 लाख रुपयांपासूनह्युंदाई व्हेन्यू किंमत 7.68 लाख रुपयांपासूनमहिंद्रा एक्सयूव्ही 300 किंमत 8.41 लाख रुपयांपासूनकिआ सोनेट किंमत 7.69 लाख रुपयांपासूननिसान मॅग्नाइट किंमत 6 लाख रुपयांपासूनरेनॉल्ट किगर किंमत 6.50 लाख रुपयांपासूनसिट्रॉईन सी ३ किंमत ५.९८ लाखांपासून
१० लाखांच्या आतील १० हॅचबॅकमारुती अल्टो के 10 ची किंमत 3.99 लाख ते 5.95 लाख रुपयेमारुती वॅगन आर किंमत 5.53 लाख ते 7.41 लाख रुपयेटाटा अल्ट्रोज किंमत 6.45 लाख ते 10.40 लाख रुपयेटाटा टियागो किंमत 5.54 लाख ते 8.05 लाख रुपयेह्युंदाई आय 20 ची किंमत 7.19 लाख ते 11.83 लाख रुपये आहेमारुती बलेनो किंमत 6.56 लाख ते 9.83 लाख रुपयेमारुती स्विफ्ट किंमत 6 लाख ते 8.98 लाख रुपयेमारुती इग्निस किंमत 5.82 लाख ते 8.14 लाख रुपयेमारुती ईकोची किंमत 5.25 लाख ते 6.51 लाख रुपये आहेह्युंदाई ग्रँड आय 10 निओस किंमत 5.68 लाख ते 8.46 लाख रुपये
१० सेदान कारमारुती डीझायरची किंमत 4.44 लाख रुपयांपासूनह्युंदाई ऑरा किंमत 6.30 लाख ते 8.87 लाख रुपयेहोंडा 6.89 लाख ते 9.48 लाख रुपयेटाटा टिगॉर किंमत 6.20 लाख ते 8.90 लाख रुपयेमारुती सियाझ किंमत 9.20 लाख ते 12.19 लाख रुपये