परदेशांत राहणाऱ्या भारतीयांकडे नवनव्या अद्ययावत कार पहायला मिळतात. भारतात त्या अव्वाच्या सव्वा किंमत मोजून इंम्पोर्ट कराव्या लागतात. देशात काही अब्जाधीशांची कमी नाहीय, पण जगातील सर्वात महागडी कार फक्त एकाच भारतीयाकडे आहे. बुगाटी कंपनीची सुपरकार काही मोजक्याच भारतीयांच्या ताफ्यात आहेत.
बुगाटीच्या कार ही ११ कोटींपासून सुरु होतात. अनेक भारतीयांकडे बुगाटीच्या या कार आहेत. परंतू, अमेरिकेत राहणाऱ्या मयुर श्री याच्याकडे बुगाटी शिऱॉन सुपरकार आहे. महत्वाचे म्हणजे ही कार जगातील फक्त १०० लोकांकडेच आहे. या कारची किंमत २१ कोटी रुपये आहे.
बुगाटी शिऱॉन एक अतिशय शक्तिशाली सुपरकार आहे. 8.0-लिटर क्वाड-टर्बोचार्ज्ड W16 इंजिन आहे आणि हे इंजिन 1479 bhp ची कमाल पॉवर आणि 1600 न्यूटन मीटरचा पिकअप टॉर्क जनरेट करू शकते. बुगाटी शिरॉनचा सर्वोच्च वेग 420 किमी प्रतितास आहे, ही कार ० ते १०० चा वेग अवघ्या २.३ सेकंदांत घेऊ शकते.
मयूरश्रीने ही सुपरकार त्याच्या वडिलांना भेट म्हणून दिली होती. लॅम्बोर्गिनी, अॅस्टन मार्टिन, पोर्श, मॅकलरेन, रोल्स रॉयस सारख्या कार त्याच्याकडे आहेत. मयूर श्री हा रिअल इस्टेट व्यावसायिक आहे. प्रामुख्याने त्यांचा व्यवसाय हा आफ्रिकेत आहे.