शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

कारमधील एअरकंडिशनर आता बनली काळाची अपरिहार्य गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 11:55 AM

कारमध्ये वातानुकूल चांगले असले पाहिजे अशी आजची हवामानाची स्थिती असते. विशेष करून शहरात एअरकंडिशनर ही कारमधील गरज बनली आहे.

ठळक मुद्देशहरातील धुरकांड्यामध्ये प्रवास करणेही त्रासदायक होते. यासाठी एअरकंडिशन असणे हे गरजेचे झाले आहे.वातानुकुलीत यंत्रणा ही १९३३ मध्ये अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात प्रथम अस्तित्त्वात आणली गेलीवातानुकुलीत यंत्रणेचा लाभ घेताना योग्यरितीने घ्यावा व त्यामुळे पैशाचा अनावश्यक व्यय टाळावा

भारतीय बाजारपेठेत सध्या बहुतांश मोटार उत्पादक कंपन्या आपल्या मोटारी अधिक खपाव्यात यासाठी अंतर्गत सौंदर्य वाढविण्यासाठीच मोटारीला ग्राहकांसमोर त्या रूपात मांडत असतात. या सुविधेचा एक भाग म्हणजे एअर कंडिशनर. वातानुकूलन यंत्रणा. कारमध्ये आता एअरकंडिशन अपरिहार्य झाले आहे. त्याशिवाय कारमध्ये आरामदायी व विशेष करून शहरातील धुरकांड्यामध्ये प्रवास करणेही त्रासदायक होते. यासाठी एअरकंडिशन असणे हे गरजेचे झाले आहे.वातानुकुलीत यंत्रणा ही १९३३ मध्ये अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात प्रथम अस्तित्त्वात आणली गेली. आरामदायी व अलिशान अशा मोटारींच्या ग्राहकांसाठी ही यंत्रणा उपलब्ध केली. उत्तरोत्तर ही यंत्रणा- व्यस्था विकसित होत गेली. आज मोटारीत वातानुकुलीत यंत्रणा ही सर्वांनाच आवश्यक झाली आहे.वातानुकूलीत यंत्रणेमुळे मोटारीतील वायुवीजन नीट तर राहाते, त्याचा फायदा व आराम प्रवासात जाणवतो. पण त्याचबरोबर त्यामुळे मोटारीच्या इंधन वापरावरही मोठा परिणाम होत असतो. ही यंत्रणा कशी वापरावी यालाही तंत्र असते ते लक्षात घेणे गरजेचे आहे.वातानुकुलीत यंत्रणेतून मोटारीत दिला जाणारा थंडगार वाऱ्याचा शिडकावा चालकाच्या पुढील डॅशबोर्डला असलेल्या छोटेखानी झरोक्यातून येत असतो. आता हे झरोके मागील आसनस्थ लोकांनाही काही मोटारींमध्ये देण्यात येतात. साधारणपणे डॅशबोर्डमध्ये असणारे हे झरोके छोटेखानी हॅचबॅकला वा मध्यम सेदान मोटारीला पुरेसे आहेत मात्र मोठ्या मोटारींमध्ये मागील आसनांवरील प्रवाशांनाही या शीतलतेचा लाभ व्हावा म्हणून छताकडील बाजूने किंवा दरवाजाच्या अंतर्गत भागातून वा मध्यभागातून झरोके देण्यात आले आहेत. अर्थात सर्व मोटारींना ही सोय नसते. वातानुकुलीत यंत्रणेबरोबरच हीटरही देण्यात येतो. या हीटरमुळे अति थंडीमध्ये छान उबदारपणा मोटारीतील प्रवाशांना मिळतो. वातानुकुलीत यंत्रणा ही आजच्या मोटारींमधील शान बनली आहे. अर्थात त्यामुळे इंधन वापर अधिक होत असतो. तो टाळण्यासाठी चढावावर मोटार जात असताना, सिग्नलला मोटार उभी असताना वातानुकुलीत यंत्रणा बंद ठेवणे उत्तम. चढावावर वातानुकुलीत यंत्रणा चालू असेल तर इंजिनावर अधिक ताण येत असतो. मोटार चालू केल्यानंतर ही यंत्रणा मग चालू करावी. प्रथम कमी मापकावर व नंतर आवश्यक वा मध्यम मापकावर वाऱ्याचा झोत स्थिर करावा. उन्हामध्ये मोटार असेल व आत गरम वातावरण असेल तर प्रथम आतील अतिगरमपणा कमी होऊन द्यावा त्यासाठी खिडक्या काही काळ उघडून मग वातानुकुलीत यंत्रणा चालू करावी. त्यानंतर काचा बंद करून घ्याव्यात म्हणजे थंडपणा चांगला तयार होईल.एकंदरीत या वातानुकुलीत यंत्रणेमुळे इंधन वापरावर होणारा ताण पाहाता आता काही काळानी थर्मल सिस्टिम इंटिग्रेशन फॉर फ्युएल इकॉनॉमी हे (टीआयएफएफई) तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. लवकरच ते मोटारींमध्ये बसविलेही जाईल. पण तोपर्यंत वातानुकुलीत यंत्रणेचा लाभ घेताना योग्यरितीने घ्यावा व त्यामुळे पैशाचा अनावश्यक व्यय टाळावा इतकेच.

 

टॅग्स :carकारAutomobileवाहन