शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

Mahindra Bolero Neo Plus: आता 7 सीटर कार विसरा, Mahindra आणतेय 9 सीटर एसयूव्ही, मिळणार Thar चं इंजिन; जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 5:44 PM

Mahindra Upcoming Car launch: महिंद्राची सर्वाधिक विकली जाणारी कार Mahindra Bolero आहे. ही गाडी Bolero आणि Bolero Neo अशा दोन मॉडेल मध्ये येते.

महिंद्रा आपल्या एसयूव्ही गाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. सध्या कंपनीची स्कॉर्पियो एन आणि XUV700 वर सर्वाधिक वेटिंग आहे. मात्र, असे असले तरी महिंद्राची सर्वाधिक विकली जाणारी कार Mahindra Bolero आहे. ही गाडी Bolero आणि Bolero Neo अशा दोन मॉडेल मध्ये येते. आता कंपनी हिचे आणखी एक मॉडेल घेऊन येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, महिंद्रा लवकरच Mahindra Bolero Neo Plus नावाने एक नवी गाडी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, या गाडीला थारला असलेले डिझेल इंजिनच दिले जात आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार महिंद्रा बोलेरो निओ प्लसमध्ये 2.2 लीटरचे mHawk डिझेल इंजिन देण्यात येणार आहे. हेच इंजिन महिंद्रा थारमध्येही देण्यात आले आहे. मात्र, बोलेरो नियो प्लसमध्ये हे इंजिन ट्यून केले जाऊ शकते. ही गाडी 7 सीटर आणि 9 सीटर व्हेरिअंटमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. हिचे एक अॅम्ब्युलन्स व्हर्जनही असेल. यात 4 सीट्स सोबत एक बेड असेल.

किती असेल किंमत? -या गाडीची किंमत 10 लाख रुपयांपासून ते 12 लाख रुपयांपर्यंत असू शकते. डायमेंशनसंदर्भात बोलायचे झाल्यास बोलेरो नियो प्लसची लांबी 4400mm, तर रुंदी 1795mm आणि ऊंची 1812mm एवढी असू शकते. तर हिचे व्हीलबेस 2680mm एवढे असेल.

बोलेरो नियो प्लसनंतर, कंपनी महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करणार आहे. ही एसयूव्ही जानेवारी 2023 मध्ये येण्याची शक्यता. ही कंपनीची पहिलीच इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. या एसयूव्हीमध्ये 39.5kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. जो 148bhp आणि 310Nm डिलिव्हर करतो. ही गाडी 8.6 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रति तास एवढा वेग धारण करते. तसेच हिची टॉप स्पीड 150 किमी प्रति तास एवढी आहे.

टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहनcarकार