शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

आता चोरीचं टेन्शन नाही, Honda नं लॉन्च केली नवी Activa; खास फिचर्स मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 1:25 PM

एकदा बाजारात आल्यावर ही Activa स्कूटर त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी TVS ज्युपिटरला टक्कर देईल.

मुंबई - होंडा मोटारसायकल एँन्ड स्कूटर इंडिया (HMSI) उद्या सोमवार, २३ जानेवारी रोजी नवीन मॉडेल लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. त्यांचे नवीन उत्पादन नवीन एडवांस फिचर्ससह सुसज्ज असेल असं कंपनीने नुकतेच जाहीर केले. हे Activa चे नवीन अपडेटेड मॉडेल असू शकते. Activa हे कंपनीच्या पोर्टफोलिओचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे आणि कंपनीने २०२० च्या सुरुवातीला हे बाजारात आणलं होते. तेव्हापासून या स्कूटरला कोणतेही नवीन अपडेट मिळालेले नाहीत. कंपनी एच-स्मार्ट तंत्रज्ञानासह नवीन अ‍ॅक्टिव्हा बाजारात आणणार असल्याचं बोललं जात आहे.

होंडाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये जो टिझर होता त्यात कंपनी आपल्या नवीन उत्पादनामध्ये एच-स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करेल. कंपनी त्याचे नाव Activa H-Smart ठेवण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप या स्कूटरबद्दल कंपनीकडून कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. उद्या एका कार्यक्रमात होंडा अधिकृतपणे ही स्कूटर लॉन्च करणार आहे.

रिपोर्टनुसार, होंडा या स्कूटरमध्ये त्यांच्या एच-स्मार्ट तंत्रज्ञानाचा भाग म्हणून नवीन अँटी-थेफ्ट सिस्टमसह अनेक नवीन फिचर्स समाविष्ट करू शकतात. एकदा बाजारात आल्यावर ही Activa स्कूटर त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी TVS ज्युपिटरला टक्कर देईल. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत या स्कूटरचे वजन थोडे कमी असू शकते, याशिवाय बॉडीवर एच-स्मार्ट ग्राफिक्स इत्यादी देखील दिसू शकतात.

Activa H-Smart मध्ये एंटी थेफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे एक अतिशय उपयुक्त फिचर आहे. सामान्यतः जेव्हा स्कूटर लॉक स्थितीत असते म्हणजे कुठेतरी पार्क केलेली असते तेथे कंपन, चाक फिरणे, पॉवर ऑन किंवा इंजिन सुरू होते, तेव्हा ही सिस्टिम तात्काळ अलार्म वाजते आणि मोटर लॉक करते. यामुळे तुम्ही सतर्क तर होताच, शिवाय चोर वाहन घेऊन पळून जाऊ शकत नाही.कंपनी या स्कूटरच्या इंजिन मेकॅनिझममध्ये काही बदल देखील करू शकते. हे शक्य आहे की नवीन इंजिन अधिक शक्तिशाली असेल.

स्कूटर 110cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड युनिट वापरेल जे 7.80 Bhp पॉवर जनरेट करेल, तर सध्याचे मॉडेल 7.68 Bhp पॉवर निर्माण करते. कंपनी त्यांच्या वाहनांमध्ये होंडा इग्निशन सिक्युरिटी सिस्टम (HISS) वापरत आहे. आता नवीन H-Smart पर्यंत स्कूटरची श्रेणी आणखी प्रीमियम बनवेल. अॅक्टिव्हा हे कंपनीने सादर केलेले पहिले मॉडेल असेल, ज्यामध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाईल. नवीन फीचर अपडेटनंतर स्कूटरची किंमत थोडी वाढेल अशी अपेक्षा आहे. सध्या Honda Activa 6G ची किंमत ७३,१७६ ते ७६,६७७ रुपये आहे. 

टॅग्स :Hondaहोंडा