ओबेन इलेक्ट्रीकने (Oben Electric) आपली पगिली बाईक भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. सध्या या इलेक्ट्रीक टू-व्हीलर कंपनीचे हे पहिले मॉडेल रोर इलेक्ट्रीक (Rorr electric) फक्त बंगळुरूमध्ये उपलब्ध असेल. नवीन Rorr इलेक्ट्रीक मोटरसायकलची डिलिव्हरी जुलै 2022 मध्ये सुरू होणार आहे.
नवीन ओबेन रोर इलेक्ट्रीक मोटरसायकलमध्ये स्टाइलिंग राउंड हेडलाइट, एलईडी टर्न इंडिकेटर, मोठा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्प्लिट-स्टाईल सीट्स, टू-पीस पिलियन ग्रॅबरेल्स आणि अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. इलेक्ट्रीक मोटरसायकल 100 kmph च्या टॉप स्पीडसह येते आणि संपूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक 200 kmph ची रेंज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. रोर इलेक्ट्रिक मोटरसायकल सध्या 99,999 रुपयांमध्ये (एक्स-शोरूम पोस्ट FAME-II सबसिडी) सह उपलब्ध आहे.
नव्या रोर इलेक्ट्रीक बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रन्ट फोर्क्स आणि रिअर मोनो शॉक देण्यात आलेत तसंच फ्रन्ट आणि रिअरला सिंगल डिस्क ब्रेक सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय सेफ्टीनेटमध्ये कंबाइंड ब्रेकिंग सिस्टमही देण्यात आलीये.