नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यात ऑटो सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. तसेच, आता नवीन वर्षात अनेक इलेक्ट्रिक गाड्या मार्केटमध्ये लाँच होणार आहेत. दरम्यान, सध्या मार्केटमध्ये ओकाया फ्रीडम इलेक्ट्रिक (Okaya Freedum) स्कूटर चर्चेत आहे. ओकाया फ्रीडम स्कूटर आकर्षक डिझाइन आणि कमी वजनासह येते. या स्कूटरची किंमत, रायडिंग रेंज, टॉप स्पीड, बॅटरी पॅकसह फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल सविस्तर जाणून घ्या...
काय आहे किंमत?ओकाया फ्रीडम इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने 74,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लाँच केली आहे. ऑन-रोड या स्कूटरची किंमत 78,581 रुपये होते.
बॅटरी पॅक आणि मोटरया इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने 1.4 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. या बॅटरीसोबत 250 W पॉवर आउटपुट असलेली BLDC मोटर जोडली आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. कंपनीकडून या बॅटरी पॅकवर 3 वर्षांची वॉरंटी दिली जाते.
स्कूटरची रायडिंग रेंजओकाया फ्रीडमच्या रायडिंग रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 70 ते 75 किमीची रेंज देते. या रेंजसह, 25 किमी प्रतितास इतका टॉप स्पीड मिळतो.
ब्रेकिंग आणि सस्पेंशन सिस्टमस्कूटरच्या दोन्ही व्हीलमध्ये ड्रम ब्रेक बसवण्यात आला असून त्यासोबत कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम (CBS) देखील जोडण्यात आले आहे. सस्पेंशन सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर याला समोरील भागात टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागील बाजूस स्प्रिंग बेस्ट शॉक ऍब्जॉर्बर सिस्टीम देण्यात आली आहे.
काय आहेत फीचर्स?ओकाया फ्रीडमच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये चार्जिंग पॉइंट, डीआरएलएस, फास्ट चार्जिंग, एलईडी टेल लाइट, एलईडी हेड लाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल स्पीडोमीटर, रिमोट स्टार्ट, पुश बटण स्टार्ट, अँटी थेफ्ट अलार्म, सेंट्रल लॉकिंग, मोटर लॉक, ड्राईव्ह मोड, वॉक असिस्ट आणि एलईडी टर्न सिग्नल लॅम्प यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.