Okinava Lite STD: इलेक्ट्रीक टू-व्हीलर निर्माता कंपनी ओकिनावाने बाजारात काही इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केले आहेत. जर तुम्ही इलेक्ट्रीक स्कूटर घेण्याचा विचार करत आहात तर कमी बजेटमध्ये म्हणजेच 65 हजार रुपयांमध्ये ओकिनावा लाइट (Okinava Lite STD) चा विचार करू शकता. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ही स्कूटर फुल चार्ज केल्यावर 60 किमीचे रेंज देते. (Okinava Lite STD electric scooter range 60 km in single charge)
Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्ज
या स्कूटरची किंमत 63990 रुपये (ऑन रोड दिल्ली) आहे. ही स्कूटर 6 हजार रुपयांच्या डाऊनपेमेंटमध्ये घरी घेऊन जाता येणार आहे. डाऊनपेमेंट नंतर तुम्हाला 36 महिन्यांचे एकूण 57990 रुपयांचे लोन घ्यावे लागणार आहे. यावर वार्षिक 9.7 टक्के व्याज लागणार आहे.
Ola Scooter ची थेट घरी देणार डिलिव्हरी; 10 रंगात, कर्ज प्रक्रिया, सर्व्हिस कशी मिळणार, जाणून घ्या...
तुम्हाला 36 महिन्यांत एकूण 74,880 रुपये भरावे लागणार आहेत. यामध्ये 16,890 रुपयांचे व्याज असणार आहे. यासाठी 2080 रुपयांचा हप्ता बसणार आहे. जर तुम्ही 60 महिन्यांचे लोन घेतले तर एकूण 86,100 रुपये भरावे लागणार आहेत. यामध्ये 28,110 रुपये व्याज असणार आहे. यासाठी तुम्हाला महिन्याला 1,435 रुपयांचा ईएमआय द्यावा लागणार आहे.
Tata Altroz EV: टाटाची नवी ईलेक्ट्रीक कार, 500 किमीची रेंज देणार; चर्चांचा बाजार गरम
या स्कूटरचा वेग 25 किमी प्रति तास आहे. कंपनीने यामध्ये 1.25 KWH ती लिथिअम आयन बॅटरी दिलेली आहे. ही बॅटरी 4 ते 5 तासांत पूर्ण चार्ज होते. यास्कूटरला 250 W ची मोटर देण्यात आली आहे. कंपनीने स्कूटरवर तीन वर्षांची वॉरंटी दिली आहे. ही स्कूटर ज्या व्यक्तींचे दिवसाला 40-50 किमीचे रनिंग आहे किंवा शहरात. गर्दीमध्ये जाणे आहे त्यांच्यासाठी ही स्कूटर योग्य आहे.