Best Mileage Electric Scooters In India: भारतात इलेक्ट्रीक स्कूटरबाबत सध्या बाजार गरम आहे. देशात सध्या हिरो इलेक्ट्रीकच्या स्कूटर जोरात विकल्या जात आहेत. परंतू दोन नंबरला एक अशी कंपनी आहे, जिचे नाव वाटते जपानी परंतू ती आहे मात्र भारतीय. या कंपनीच्या स्कूटरला देखील मोठी मागणी आहे. कारण या कंपनीच्या स्कूटर स्वस्तही आहेत आणि चांगली रेंजही देतात.
या कंपनीचे नाव आहे ओकिनावा. ही सध्याच्या घडीला देशातील दोन नंबरची ईलेक्ट्रीक स्कूटर कंपनी आहे. ओकिनावाकडे सध्या Okinawa Dual, Okinawa PraisePro, Okinawa R30, Okinawa Ridge आणि Okinawa Lite सारख्या स्कूटर आहेत. चांगला लूक आणि सोबत चांगले फिचर्सही या स्कूटरमध्ये मिळतात. बॅटरीची रेंजही चांगली आहे. चला या स्कूटर आणि त्यांच्या किंमतीविषयी माहिती घेऊया.
Okinawa PraisePro ची किंमत 79,845 रुपये आहे. सर्वाधिक वेग 58 kmph आणि सिंगल चार्जवर बॅटरीची रेंज 88 किलोमीटर आहे. Okinawa iPraise+ ची किंमत 1.05 लाख रुपये आहे. रेंज 139 किलोमीटर असून 58 kmph वेग आहे. यानंतर Okinawa Dual इलेक्ट्रीक स्कूटर येते. याची किंमत 61,998 ते 82,995 रुपये आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 25 kmph आणि सिंगल चार्जवर बॅटरी रेंज 130 किलोमीटर आहे.
Okinawa R30 ची किंमत 61,998 रुपये आहे. बॅटरी रेंज 60 km आहे. टॉप स्पीड 25 kmph आहे. Okinawa Ridge ची किंमत 64,797 रुपये आहे. या स्कूटरची रेंज 84 km पर्यंत आहे. तर सर्वाधिक वेग हा 45 kmph आहे. Okinawa Lite ची किंमत 66,993 रुपये आहे. या स्कूटरची रेंज 60 km आणि टॉप स्पीड 25 kmph आहे. लवकरच ओकिनावा आणखी एक नवीन स्कूटर लाँच करणार आहे.