ओला इलेक्ट्रिकनं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आज आपली स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली. तर याच लॉन्चिंग सोहळ्यात बहुप्रतिक्षीत ओलाइलेक्ट्रिक कारचीही झलक पाहायला मिळाली आहे. कंपनीनं आजच्या इव्हेंटच्या अखेरीस Ola Electric Car चा टिझर प्रदर्शित करण्यात आला. जणू एखाद्या हॉलीवूड चित्रपटाचा टिझर असावा अशा पद्धतीनं दमदार एन्ट्री कारची दाखवण्यात आली आहे.
टीझरमध्ये ओला इलेक्ट्रीकचा कारचा डॅशबोर्ड आणि फ्रंट लूक दिसत आहे. कारच्या डॅशबोर्डबद्दल बोलायचं झालं तर यात एक स्वेअर शेपचं स्टिअरिंग व्हील दिसत आहे. ज्यावर जवळपास सर्वच कंट्रोल्स देण्यात आलेले आहेत. तसंच एक मोठी आयलँड फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट स्क्रीन देखील दिसत आहे.
कारचा फ्रंट लूक पाहिला तर संपूर्ण बोनेटवर एक एलईडी लाइट स्ट्रिप देण्यात आली आहे. जी एलईडी डीआरएल असण्याची शक्यता आहे. तसंच कारच्या फ्रंट लूकमध्ये ड्युअल हेडलॅम्प सेट अप देखील देण्यात आला आहे. तसंच साइट मिररवर काही ठिकाणी टाटा कर्व्हचा कारचा फिल येतो.
ओलाची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्चदिवाळीचं औचित्य साधून ओला कंपनीनं आपली नवी इलेक्ट्रीक स्कूटर लॉन्च केली आहे. Ola S1 Air नावानं नवी इलेक्ट्रीक स्कूटर बाजारात आणली आहे. कंपनीचे प्रमुख भावेश अग्रवाल यांनी या नव्या स्कूटरची संपूर्ण माहिती आज सांगितली. अवघ्या २५ पैशात प्रति किलोमीटर खर्चात ही स्कूटर चालणार आहे. Ola S1 Air स्कूटरला कंपनीनं फ्लॅगशिप प्रोडक्ट Ola S1 च्याच धर्तीवर अपग्रेड केलं आहे. पण नव्या स्कूटरची किंमत आधीच्या स्कूटरपेक्षा खूप कमी आहे. कंपनीनं आज Ola S1 Air स्कूटर अवघ्या ८४,९९९ रुपयांत लॉन्च केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर २४ ऑक्टोबरपर्यंत कंपनीनं या स्कूटरवर छान ऑफर सुद्धा दिली आहे. सध्यासाठी तुम्हाला या स्कूटरसाठी ७९,९९९ रुपये द्यावे लागतील. तसंच ही स्कूटर ९९९ रुपयांत बूक करता येणार आहे.