शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत OLA ने मारली बाजी; जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 5:13 PM

गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी लागू करण्यात आलेली FAME II सबसिडी 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली.

नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्ही) मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी लागू करण्यात आलेली FAME II सबसिडी 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली. त्यामुळे जून महिन्यात ईव्हीच्या विक्रीत जवळपास 56 टक्क्यांची घट झाली आहे. मात्र यावेळी ऑगस्ट महिन्यात ईव्हींनी पुन्हा जोर पकडला असून बाजार पुन्हा चार्ज होताना दिसत आहे.

गेल्या जून महिन्यात ईव्हीच्या एकूण 45,984 युनिट्सची विक्री झाली, जी जुलै महिन्यात 11.55 टक्क्यांनी वाढून 51,299 युनिट्सवर पोहोचली. दरम्यान, या महिन्यात दुचाकी सेगमेंटमध्ये Ola, TVS आणि Ather Energy यांच्यात टक्कर सुरू आहे. या कालावधीत, कंपनीने 18 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री करून सेगमेंटमध्ये 40 टक्के कब्जा केला आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर एक स्कूटर iQube आहे. यासह अथर एनर्जीने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

ओला इलेक्ट्रिक आणि अथर एनर्जी या दोन्ही कंपन्या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आणण्यासाठी स्पर्धा करत आहेत. अलीकडच्या काळात ओला ईव्हीने आपली सर्वात स्वस्त ईव्ही ओला एस एअर लाँच केली आहे. ज्याची किंमत 1,09,999 (एक्स-शोरूम) आहे. ही किंमत 15 ऑगस्टपर्यंत लागू आहे. यानंतर, किंमत 10,000 रुपयांपर्यंत वाढविली जाईल.

ओला S1 एअरओला S1 एअर कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर पूर्वीपेक्षाही चांगला परफॉर्मेंस देईल. ही स्कूटर नवीन निऑन ग्रीन कलरमध्ये सादर करण्यात आली आहे. हे 2.7kW मोटरसह सादर केले गेले होते, परंतु आता 4.5kW युनिटसह अपग्रेड केले गेले आहे. बेल्ट-ड्राइव्हऐवजी आता मोटार वापरण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ते एका चार्जमध्ये 125 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.  

एथर 450  एथरअखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर, एथर एनर्जीने आपले सर्वात किफायतशीर मॉडेल सादर केले आहे. कंपनीने या स्कूटरचा नवीन टीझर देखील जारी केला आहे, त्याची सुरुवातीची किंमत 1,29,999 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. नवीन Ather 450S सिंगल चार्जवर 115 किमीच्या IDC रेंजसह आणि 90 किमी प्रतितास या वेगवान गतीसह येईल.

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर