Ola Electric ने बारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये दमदार पदार्पण केले आहे. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर आता कंपनी बाजारात पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकिल आणण्याची तयारी करत आहे. याचे संकेत कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनीच दिले आहेत. यापूर्वी, कंपनीने इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची घोषणाही केली होती.
भाविश अग्रवालने काल केलेल्या ट्विटनंतर ओला बाइक्सची चर्चा सुरू झाली आहे. भाविशने ट्विटरवर 'बिल्डिंग सम' (Building Some) आणि सोबत बाइकचे इमोजी पोस्ट केले आहेत. याशिवाय, दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी यूजर्सला विचारले की, त्यांना कोणत्या प्रकारची बाइक आवडेल. यात व्होटिंगसाठी स्पोर्ट, क्रूजर, अॅडव्हेंचर आणि कॅफे रेसरचे पर्याय देण्यात आले आहेत.
दरम्यान, Ola Electric Bike ची आणखी माहिती मिळू शकलेली नाही. परंतू, असा अंदाज बांधला जात आहे की, कंपनी चांगली रेंज आणि परवडणाऱ्या किमतीत बाइक लॉन्च करेल. कंपनीने दिवळीच्या मुहूर्तावर स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air लॉन्च केली आहे. याची किंमत 84,999 रुपयांपासून सुरू होते. याची रेंज 101 किलोमीटरपर्यंत आहे.