नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिकनं आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकचा टीझर शेअर केला आहे. त्यानुसार, ही बाईक १५ ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे. मात्र, ओला कोणत्या प्रकारची बाईक लॉन्च करणार आहे, हे टीझरवरून अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंपनीनं गेल्या वर्षी सादर केलेल्या चार इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट्स बाईकपेक्षा टीझरमधील बाईकचा फ्रंट प्रोफाईल पूर्णपणे वेगळा आहे. गेल्या वर्षी कंपनीनं ४ इलेक्ट्रिक मोटरसायकल क्रूझर, ॲडव्हेंचर, रोडस्टर आणि सुपरस्पोर्ट लॉन्च केल्या होत्या.
ओला कंपनीनं टीझर शेअर केलेल्या बाईकमध्ये दोन एलईडी लाईट आणि या लाईटच्यावर आडव्या ठेवलेल्या एलईडी स्ट्रिप दिसतात. यासोबतच, बाईकमध्ये विंडस्क्रीन देखील लावला जाऊ शकतो आणि हँड लॅप काउल देखील दिसू शकतो. याशिवाय, बाईकला अँगुलर टँक शॉउड्स देखील दाखवण्यात आले आहेत, ते पाहून ती एक स्ट्रीटृ बाईक असल्याचे दिसते. तसंच, हँडलबार सिंगल पीसमध्ये दिसत आहे, जो अगदी सरळ ठेवला जातो.
ओला कॅब्सचं सीईओ भावीश अग्रवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबद्दल एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक मोटरसायकलची झलक पाहिली जाऊ शकते. हा टीझर १२ सेकंदांचा आहे, ज्यावर भाविश अग्रवाल यांनी लिहिलं आहे की, बाईकचं भविष्य इथं आहे. १५ ऑगस्टला आमच्यात सामील व्हा.
दरम्यान, या टीझरशिवाय या इलेक्ट्रिक बाईकबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही प्रीमियम बाईक असण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आधी लोडेड मॉडेल्स लॉन्च करू शकते आणि त्यानंतर येत्या काही दिवसांत कंपनी कमी किमतीची प्रोडक्ट सुद्धा आणू शकते. कंपनी एक नवीन ई-ब्रँड स्थापन करु शकेल.