भारतात कमी वेळात प्रसिद्धी आणि तेवढीच कुप्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या ओला ईलेक्ट्रीक कंपनीने स्कूटरमध्ये जम बसलेला नसताना आता ईलेक्ट्रीक कारची तयारी सुरु केली आहे.
ओलाने ईलेक्ट्रीक कारचा टीझर जारी केला आहे. गेल्या वर्षीच कंपनीने ईलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली होती. आज रविवारी ओलाने तामिळनाडूच्या फ्युचर फॅक्टरीमध्ये ओला स्कूटरच्या सर्व ग्राहकांना रपेट मारण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यमक्रमावेळी ओला ईलेक्ट्रीकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी आपल्या आगामी इलेक्ट्रीक कारचा टीझर व्हिडीओ लाँच केला. या व्हिडीओमध्ये कॉन्सेप्ट मॉडेलच्या लुक आणि डिझाईनची झलक दिसते.
ही कार हॅचबॅक आणि एसयुव्ही क्रॉसओव्हर सारखी असू शकते किंवा इलेक्ट्रीक सेदान असेल असे अंदाज बांधले जात आहेत. टिझर व्हिडीओनुसार ओला इलेक्ट्रिक कारचे डिझाईन खूप फ्यूचरिस्टिक असेल. यामध्ये लेटेस्ट फिचर्स आणि चांगले रेंज देण्यात येईल. गेल्या वर्षीच अग्रवाल यांनी आपली पहिली इलेक्ट्रीक कारची कॉन्सेप्ट इमेज शेअर केली होती.
ओलाची कार पाहण्यासाठी व्हिडीओ ५३ व्या मिनिटापासून पहा....
या कारमध्ये स्लीक एलईडी हेडलँप, स्लॉपी विंडशिल्ड आणि स्पोर्टी अलॉय व्हील्स दिसतात. फ्रंटला ग्रिल्स आणि डोअर हँडल नसण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक कारचा स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात आला आहे. आर्किटेक्चरला खास इलेक्ट्रिक मोटर, अकोमोडेट बॅटरीज आणि इलेक्ट्रिक कॉम्पोनेंट्ससाठी डेव्हलप करण्यात आले आहे. येत्या काळात इलेक्ट्रिक कारबाबत आणखी काही माहिती समोर येईल. या कारची रेंज 300 किलोमीटर पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. किंमतही १० लाखांपेक्षा अधिक असू शकते.