Ola Electric Scooters : ऑटो मोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स आणत आहे. दरम्यान, दिवाळी सणानिमित्त अनेक ऑटो कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरवर सवलतीची ऑफर दिली होती. मात्र, दिवाळी ऑफर संपल्यानंतरही ओला इलेक्ट्रिक स्कूटरवरील (Ola Electric Scooters) सवलत सुरूच आहे.
ओला इलेक्ट्रिकने बिगेस्ट ओला सीझन सेल (Biggest Ola Season Sale - BOSS) मोहीम सुरू केली आहे, ज्या अंतर्गत ओला स्कूटरवर 15 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची चांगली संधी आहे. 15 हजार रुपयांच्या सूटशिवाय, ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्यास, पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत दरवर्षी 30 हजार रुपयांपर्यंतची बचत देखील होईल.
ओला कंपनीचे म्हणणे आहे की, Ola S1X (2kWh) स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी दररोज 30 किलोमीटर स्कूटर चालवल्यास ग्राहक एका वर्षात 31 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकतील. म्हणजेच काही वर्षांतच ग्राहक स्कूटरची किंमत वसूल होईल. ओला ऑफर अंतर्गत, Ola S1X आणि Ola S1 Pro मॉडेल्सवर 15 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. दुसरीकडे, Ola S1 Air वर 7 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल.
Ola S1 Pro Price in Indiaओला इलेक्ट्रिकच्या S1 रेंजमध्ये 6 मॉडेल्स आहेत. Ola S1 Pro ची किंमत 1,29,999 रुपये (एक्स-शोरूम), Ola S1 Air ची किंमत 1,07,499 रुपये (एक्स-शोरूम) आहे. Ola S1 Air रेंजबद्दल बोलायचे झाले तर, ही स्कूटर फूल चार्ज केल्यानंतर 151 किलोमीटर पर्यंतचे अंतर कापू शकते. तसेच, Ola S1 Pro चे सेकंड जनरेशन मॉडेल फूल चार्जमध्ये 195 किलोमीटरपर्यंत धावू शकते.
Ola S1X Rangeया इलेक्ट्रिक स्कूटरच्या 2kWh व्हेरिएंटची रेंज फुल चार्ज झाल्यावर 95 किलोमीटर, 3kWh व्हेरिएंटची रेंज 151 किलोमीटर, 4kWh व्हेरिएंटची रेंज 193 किलोमीटर असेल आणि Ola S1X Plus ची बॅटरी फुल चार्ज केल्यावर 151 किलोमीटर पर्यंत सपोर्ट करेल.
Ola S1X Price in Indiaया इलेक्ट्रिक स्कूटरच्या 2kWh व्हेरिएंटची किंमत 74,999 रुपये (एक्स-शोरूम), 3kWh व्हेरिएंटची किंमत 87,999 रुपये (एक्स-शोरूम) आणि 4kWh व्हेरिएंटची किंमत रुपये 1,01,999 (एक्स-शोरूम) आहे. ओला ऑफर फक्त निवडक शहरांमध्ये निवडक व्हेरिएंटवर मिळत आहे.