शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

Ola E scooter मध्ये रिव्हर्स गिअर? मागे जाणाऱ्या स्कूटरचा व्हिडीओ, त्यावर सीईओंचेही 'उलटे' संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 3:53 PM

Ola Electric scooter reverse gear: भावेश यांनी 17 सेकंदांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये स्कूटरद्वारे रिव्हर्स ड्रायव्हिंग केली जात असल्याचे दाखविण्यात आले आहे.

ओला आपली पहिली इलेक्ट्रीक स्कूटर (Ola Electric Scooter ) 15 ऑगस्टला लाँच करणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती करण्यात येत असून कंपनीचे सीईओ भावेश अग्रवाल सोशल मीडियावर सतत काही ना काही तर वेगळे असे पोस्ट करू लागले आहे. भावेश हळूहळू स्कूटरचे फीचर्स रोल आऊट करत असले तरी देखील आज त्यांनी ज्या गोष्टीचा खुलासा केला आहे, त्यावरून ओलाची स्कूटर कल्ला करणार आहे एवढे नक्की.  (Ola Scooter new feature revealed: Ride in reverse. Details here)

Ola Scooter ची थेट घरी देणार डिलिव्हरी; 10 रंगात, कर्ज प्रक्रिया, सर्व्हिस कशी मिळणार, जाणून घ्या...भावेश यांनी 17 सेकंदांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये स्कूटरद्वारे रिव्हर्स ड्रायव्हिंग केली जात असल्याचे दाखविण्यात आले आहे. खरोखरच एवढ्या वेगात आणि चपखलपणे मध्ये सिग्नल कोन ठेवून स्कूटर मागे नेली जात नसली तरी देखील त्यांना ओला स्कूटरमध्ये रिव्हर्स गिअर आहे हे सांगायचे आहे. यासाठी व्हिडीओ एडीट केला असेल हे नक्की असले तरी त्यांनी या व्हिडीओवर देखील उलट लिहिले आहे. 

Ola electric scooter ची प्रतिक्षा अखेर संपली; कंपनीकडून लाँचिंग तारीख जाहीर

या व्हिडीओमध्ये सुरुवातीच्या सहा सेकंदांत स्कूटर रिव्हर्स जात आहे. भावेश यांनी यासोबत '!won em ot netsiL' असे कॅप्शन दिले आहे. तुम्हाला हे काय आहे हे कळलेले नसले तरी त्याचे उलट केल्यास Listen to me now! असे लिहिले आहे. रस्त्याच्या मधे ट्रॅफिक कोन ठेवण्यात आले आहेत. ते रिव्हर्समध्ये क्रॉस करत असल्याचे दाखविण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे रायडरचा चेहरा पुढील बाजुला आहे.

Ola Scooter 15 ऑगस्टला लाँच केली जाणार आहे. तसेच या स्कूटरचा कोणताही डीलर नेमण्यात येणार नाहीय. म्हणजेच तुमच्या आजुबाजुला या स्कूटरचे शोरुम नसणार आहे. यामुळे ही स्कूटर थेट घरी डिलिव्हर केली जाणार आहे. ola Electric आपल्या Series-S स्कूटरच्या डिलिव्हरीसाठी ‘डायरेक्ट-2-कंज्यूमर’ (D2C) मॉडेल अवलंबणार आहे. थेट ग्राहकाच्या घरी नेऊन ही स्कूटर दिली जाणार आहे. Ola Electric व्हेईकल मॅन्युफॅक्चरर कंपनी नाही तर टेक मोबिलिटी स्टार्टअप म्हणून संबोधत आहे. ओला स्कूटर केवळ घरी डिलिव्हर केली जाणार नाही, तर पुढच्या सर्व्हिसेस देखील दारातच येऊन दिल्या जाणार आहेत. यामुळे डीलरशीपचे पैसे वाचणार आहेत. (When Ola Electric scooter launch? )

Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्ज

टॅग्स :Olaओलाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेड