जर तुम्ही ओलाची स्कूटर बुक केली असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कालच कंपनीने ओला एस१ स्कूटरचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्या आधीच कंपनीने ओलाची एस१ स्कूटर ज्या लोकांनी बुक केली आहे त्यांना ओला एस१ प्रो अधिकचे पैसे न घेता दिली जाणार आहे. ओला इलेक्ट्रीकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. ओला एस१ च्या स्कूटरची मागणी केलेल्या ग्राहकांना कंपनी Ola S1 Pro हार्डवेयर देणार आहे. जर ओला एस १ प्रोची फिचर्स वापरायची असतील तर तुम्हाला त्यासाठी जादाचे पैसे द्यावे लागणार आहेत.
ओला एस१ ची रेंज १२१ किमी आणि एस १ प्रो ची रेंज १८१ किमी आहे. यामुळे लोकांनी जास्त रेंजच्या स्कूटरला पसंती दिली आहे. ज्या लोकांचा प्रवास खूप कमी आहे त्यांनी एस१ प्रोची मागणी नोंदविली होती. यापैकी ज्या लोकांनी स्कूटरचे सर्व पैसे अदा केले आहेत किंवा सुरुवातीचे २०००० रुपये दिले आहेत त्यांना ही ऑफर मिळण्याची शक्यता आहे. येत्या २१ जानेवारीला उर्वरित रक्कम भरण्यासाठी या ग्राहकांना विंडो खुली केली जाणार आहे.
Ola Electric Scooter: ओलाने इलेक्ट्रीक स्कूटर एस१ चे उत्पादन बंद केले; ग्राहकांना संदेश गेलेओलाच्या एस१ प्रो स्कूटरला मोठी मागणी आहे. यामुळे कंपनीने याच स्कूटरकडे लक्ष पुरविले असून एस१ ची बुकिंग केलेल्यांना सुरुवातीला ओलाने एस१ प्रोचे हार्डवेअर असलेली स्कूटर दिली होती. मात्र, त्यांना सॉफ्टवेअर, अन्य बाबी या बेसिक दिल्या आहेत. परंतू आता कंपनीने असे न करता या स्कूटरचे उत्पादनच थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना तसे मेल करण्यात आले असून त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत.