नवी दिल्ली : भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री खूप वेगाने पुढे जात आहे. सध्या सर्व परदेशी कंपन्या भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीशी संबंधित आहेत आणि इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लासह अनेक कंपन्या सामील होण्याचा विचार करीत आहेत. मात्र, टेस्लाचा भारतात येण्याचा मार्ग अद्याप खुला झालेला नाही. टेस्ला कंपनी आणि भारत सरकार यांच्यात सर्व गोष्टींवर सहमती झालेली नाही. टेस्का कंपनी भारतात आल्यानंतर येथील स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण, टेस्ला कंपनी सध्या भारतात आली नसली तरी, येथील ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये खूप स्पर्धा आहे.
मारुती, टाटा आणि ह्युंदाई सारख्या अनेक कंपन्याला आप पोर्टफोलिओ एकमेकांपेक्षा चांगले सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आता या सर्वांच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. कारण आणखी एक कंपनी कार बाजारात आपले अस्तित्व निर्माण करणार आहे. दरम्यान, ओला इलेक्ट्रिक भारतात स्पोर्टी कार बनवण्याच्या तयारीत आहे, असे ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटरवर कारचा टीझर जारी करून ही घोषणा केली आहे. ते म्हणाले, "आम्ही भारतात तयार होणारी सर्वात स्पोर्टी कार बनवणार आहोत!"
दरम्यान, ओला इलेक्ट्रिक आधीपासूनच इलेक्ट्रिक कार बनविण्यावर काम करत आहे, ज्याची घोषणा भाविश अग्रवाल यांनी देखील केली होती. आता त्यांच्याकडून दुसरी कार बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, दोन्ही कारबद्दल फारशी माहिती देण्यात आलेली नाही. याबद्दल एकच गोष्ट माहीत आहे की, कंपनी या कार्सवर काम करत आहे आणि ज्या कारची याआधी घोषणा करण्यात आली होती, ती कंपनी येत्या 2 ते 3 वर्षात लॉन्च करू शकते. सध्या, ओला इलेक्ट्रिक फक्त इलेक्ट्रिक स्कूटर तयार करत आहे, ज्या विक्रीसाठी देखील उपलब्ध आहेत.