शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती
2
यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 
3
“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा
4
सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा; सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश
5
"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  
6
INDU19 vs JPNU19 : भारतीय संघानं २११ धावांनी जिंकला सामना; जाणून घ्या सेमीचं समीकरण
7
जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?
8
“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले
9
"देवीने स्वप्नात येऊन सांगितलं, बळी द्या म्हणजे मुलगा बरा होईल", त्यानंतर घडलं भयानक...  
10
स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!
11
“शेवटी भाजपा सांगेल तेच आता करावे लागणार”; मनसे नेत्याची एकनाथ शिंदेवर टीका
12
बांगलादेशमधील हिंदूंसाठी ठाकरे गट आक्रमक, प्रियंका चतुर्वेदींचं थेट मोदींना पत्र, केली अशी मागणी 
13
धक्कादायक! फुटबॉल मॅचमध्ये तुफान राडा, चाहते भिडले, हाणामारीत १००हून जास्त लोकांचा मृत्यू (Video)
14
भाजपाचा विधिमंडळ गटनेता कोण, निर्मला सीतारमन आणि रूपानींच्या उपस्थितीत होणार निर्णय
15
एकनाथ शिंदे नाराज होणं स्वाभाविक, त्यांच्यावर 'ही' जबाबदारी सोपवा; आठवलेंची नवी मागणी
16
Video कॉलने ९० वर्षीय आजोबांच्या आयुष्यात वादळ! आयुष्यभरात कमावलेले १.१५ कोटी गायब
17
८ दिवसांत २२ वेळा लागली शेतकऱ्याच्या घराला आग, धक्कादायक प्रकारामुळे गावकरी भयग्रस्त
18
'इतकं स्पष्ट बोलूनही शिंदेंवर आरोप करणं योग्य नाही'; संजय शिरसाटांनी मांडली भूमिका
19
ओला इलेक्ट्रिक ३२०० नवीन स्टोअर्स उघडणार, देशभरातील सर्व्हिस नेटवर्क मजबूत करणार!
20
२४ तासांत युटर्न! अविनाश जाधवांनी घेतला राजीनामा मागे; राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करणार

ओला इलेक्ट्रिक ३२०० नवीन स्टोअर्स उघडणार, देशभरातील सर्व्हिस नेटवर्क मजबूत करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 4:31 PM

Ola Electric : ओला इलेक्ट्रिक कंपनीने सोमवारी एका निवेदनात सांगितले की, कंपनी २० डिसेंबर २०२४ पर्यंत आपल्या स्टोअर्सची संख्या ४००० पर्यंत वाढवणार आहे.

Ola Electric : सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. त्यामुळे ओला इलेक्ट्रिक ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठ्या योजनेवर काम करत आहे. देशभरात आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची पोहोच वाढवण्यासाठी कंपनी आपल्या मालकीच्या स्टोअर्सची संख्या ४००० पर्यंत वाढवणार आहे. 

ओला इलेक्ट्रिक कंपनीने सोमवारी एका निवेदनात सांगितले की, कंपनी २० डिसेंबर २०२४ पर्यंत आपल्या स्टोअर्सची संख्या ४००० पर्यंत वाढवणार आहे. सध्या ओलाचे देशभरात ८०० स्टोअर्स आहेत. म्हणजेच कंपनी अवघ्या २० दिवसांत ३२०० नवीन स्टोअर्स उघडणार आहे. या नवीन स्टोअर्समध्ये ग्राहकांना सर्व्हिस सुविधा मिळतील, ज्यामुळे कंपनीचे देशभरातील सर्व्हिस नेटवर्क मजबूत होईल.

ओला इलेक्ट्रिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भाविश अग्रवाल म्हणाले, "आमच्या विस्तृत 'डायरेक्ट-टू-कंझ्युमर' (D2C) नेटवर्क आणि आमच्या नेटवर्क पार्टनर प्रोग्राम अंतर्गत 'टचपॉइंट्स' सह, आम्ही मोठ्या आणि मध्यम शहरांद्वारे  देशभरात पोहोचू शकतो." दरम्यान,'नेटवर्क पार्टनर प्रोग्राम' अंतर्गत २०२५ च्या अखेरपर्यंत सेल्स आणि सर्व्हिसमध्ये  दहा हजार पार्टनर्सचा समावेश करण्याची कंपनीची योजना आहे.

ओला स्कूटरची विक्री ३० टक्क्यांनी घसरलीओला इलेक्ट्रिकसाठी हे चढ-उतार नवीन नाहीत. अलीकडच्या काळात, कंपनीने तिच्या विक्रीत सातत्यपूर्ण बदल पाहिले आहेत. नोव्हेंबर महिन्यात ओला स्कूटरची विक्री मोठ्या आकड्याने घसरली आहे. उत्सव काळात सुरु केलेली बॉस ऑफर आजही कंपनीने सुरुच ठेवली आहे. तरीही नोव्हेंबरमध्ये कंपनीच्या विक्रीत ३० टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ४०००० हून अधिक स्कूटर कंपनीने विकल्या होत्या. नोव्हेंबरला ही विक्री २७७४६ वर आली आहे.  

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग