कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये भारतात 25,000 हून अधिक इलेक्ट्रीक स्कूटर्सची विक्री केल्याची माहिती ओला इलेक्ट्रीकने सोमवारी जाहीर केले. दरम्यान, यानंतर बाजारपेठेतील 30 टक्के हिस्सा मिळवला आहे. कंपनीनं केवळ आपला ग्रोथ रेट कायम ठेवण्यात यश मिळवलेलं नाही, तर ऑटोमोबाईल विक्रीसाठी डिसेंबर महिना थोडा कमी विक्रीचा ठरला असला तरी कंपनीनं रकॉर्ड विक्री केल्याचा दावा ओलाकडून करण्यात आलाय.
ओला S1 इलेक्ट्रीक स्कूटरला देशात मोठं यश मिळालं असल्याचं कंपनीनं एका प्रेस रिलीजमध्ये सांगितलं आहे. वाढलेलं नेटवर्क आणि वाढत्या मागणीसह ओला इलेक्ट्रीक तेजीनं वाढत आहे. 2022 मध्ये ग्लोबल ईव्ही हब बनण्याच्या दिशेत भारताच्या प्रवासात महत्त्वाची बाब ठरत असल्याची मत विक्री बाबत बोलताना ओला इलेक्ट्रीकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी व्यक्त केलं.
ओला सद्यस्थितीत भारतात सर्वात तेजीनं वाढणारी ईव्ही कंपनी आहे. मिशन इलेक्ट्रीकसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि देशआत ईव्ही तयार करण्यात यशस्वी राहिलो आहोत. ओला आता सर्वात मोठी आणि तेजीनं वाढणारी कंपनी आहे. भारताची ईव्ही बाजारपेठ देशात ईव्हीसाठी पुझील वर्षी फ्लडगेट उघडण्याच्या तयारीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ओलाचे सध्या देशात 100 एक्सपिरिअन्स सेंटर्स आहेत. मार्च 2023 च्या अखेरपर्यंत आणखी 200 आऊटलेट सुरू करण्याचीही कंपनीची योजना आहे.