इलेक्ट्रीक टू व्हीलर क्षेत्रात डिसेंबरमध्ये मोठी उलथापालथ झालेली आहे. डिसेंबरमध्ये बजाजने ओला ईलेक्ट्रीक स्कूटरला मागे टाकत पहिला नंबर पटकावला आहे. परंतू, जर पूर्ण वर्षाच्या विक्रीच्या आकड्यांकडे पाहिले तर ओलाच्या तुलनेत बजाज, टीव्हीएस, एथर कुठे म्हणजे कुठेच नाहीत.
ओलाच्या सर्व्हिसला कंटाळून डिसेंबरमध्ये ग्राहकांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे. सरकारी यंत्रणांनी ओलाला सर्व्हिससाठी झापलेले आहे. अशातच ओला आता ईलेक्ट्रीक मोटरसायकल लाँच करणार आहे. यामुळे ओलाला मोठा बुस्ट मिळण्याची शक्यता आहे. यामुळे बजाजने मिळविलेला पहिला क्रमांक किती काळ टिकतो हे देखील या बुस्टवर अवलंबून आहे.
२०२४ मध्ये १२ महिन्यांत ओलाने ४ लाखांहून अधिक स्कूटर विकल्या आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बजाज नाही तर टीव्हीएस आहे. टीव्हीएसने २.२० लाख आयक्यूब विकल्या आहेत. २०२४ मध्ये एकूण 11,48,529 ईलेक्ट्रीक दुचाकी विकल्या गेल्या आहेत. यात ओलाचा खूप मोठा वाटा आहे.
बजाजने १२ महिन्यांत १.९३ लाख चेतक विकल्या आहेत. एथरने मागील वर्षात 1,26,174 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. हिरोच्या विडा ब्रँडने 43,695 स्कूटर विकल्या आहेत. ग्रीव्स इलेक्ट्रिक मोबिलिटी प्राइवेट लिमिटेड ने 35,057 स्कूटर विकल्या आहेत. बीगौस ऑटो प्राइवेट लिमिटेड ने 18032 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. कायनेटीकने 11,457 इलेक्ट्रिक टू-व्हीलर विकल्या आहेत. रिव्होल्टने 9956, बाउंस इलेक्ट्रिकने 6972, ओकाया ईवीने 58615 स्कूटर विकल्या आहेत.