शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
3
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
4
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
6
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
7
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
8
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
9
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
10
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
11
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
12
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
13
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
14
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
15
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
16
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
17
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
18
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
19
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
20
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले

Ola Electric Scooter : ओलाच्या 'या' इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय बंपर डिस्काउंट, जाणून घ्या किंमत....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 4:44 PM

Ola Electric Scooter : ओला कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे तुम्ही स्वस्तात ओलाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकतात.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत मोठ्या झाली आहे. भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणार असाल किंवा खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दरम्यान, ओला कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे तुम्ही स्वस्तात ओलाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकतात.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ओला कंपनीने प्रजासत्ताक दिनाची ऑफर सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक असणारी ओला S1 Pro च्या खरेदीवर तब्बल 15 हजारांची सूट मिळणार आहे. दरम्यान, ही ऑफर 10,000 चा फ्लॅट डिस्काउंट आणि स्कूटरच्या खाकी कलर व्हेरिएंटवर 5,000 चा अतिरिक्त सवलतीच्या स्वरूपात उपलब्ध आहे.

किती तारखेपर्यंत ऑफर?ओला एक्सचेंज ऑफरसह खरेदीदारांना 10,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. ही ऑफर आज 26 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत उपलब्ध असणार आहे.

ओलाने ट्विटद्वारे काय म्हटले?ओला इलेक्ट्रिकने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या ऑफरची घोषणा केली. "भारताच्या #1 EV वर स्विच करण्यासाठी कारण हवे आहे? या प्रजासत्ताक दिनी आम्ही तुम्हाला खूप काही देत ​​आहोत! अविश्वसनीय ऑफरचा आनंद घ्या आणि बरेच काही", असे ओलाने ट्विटद्वारे म्हटले आहे.

कलर ऑप्शनदरम्यान, ओला S1 Pro ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी 2021 मध्ये लाँच झाली होती. इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.40 लाख रुपयांपासून सुरू होते. ही स्कूटर पोर्सिलेन व्हाइट, खाकी, निओ मिंट, कोरल ग्लॅम, जेट ब्लॅक, मार्शमॅलो, लिक्विड सिल्व्हर, मिलेनियल पिंक, अँथ्रासाइट ग्रे, मिडनाईट ब्लू आणि मॅट ब्लॅक यासह अनेक कलर ऑप्शनमध्ये आणली आहे.

स्पीड , रेंज आणि चार्जिंग टाईम?ई-स्कूटर 170 किमी पर्यंत चांगली रेंज ऑफर करण्याचा दावा केला जातो. Ola S1 Pro 2.9 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग वाढवेल असे म्हटले जाते. स्कूटर चार्ज होण्यासाठी 6.5 तास लागतात. यात इको, नॉर्मल, स्पोर्ट्स आणि हायपर ड्रायव्हिंग मोड आहेत. 

15 मिनिटांच्या चार्जिंगसह 50 किमी रेंज अलीकडेच कंपनीने ओला S1 Pro साठी MoveOS 3 अपडेट जारी केला आहे. ही स्कूटर OS हिल-असिस्ट, जलद चार्जिंग आणि अनेक नवीन फीचर्ससह येते. हे फक्त 15 मिनिटांच्या चार्जिंगसह 50 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. यामध्ये तुम्हाला पार्टी मोड आणि अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळतात. 

टॅग्स :Olaओलाscooterस्कूटर, मोपेडelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर