शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

OLA S1 Pro Vs TVS iQube ST: ओला स्कूटरची पर्चेस विंडो खुली झाली, पण जरा थांबा! TVS ने दिला त्याहून भारी पर्याय

By हेमंत बावकर | Published: May 20, 2022 2:39 PM

ओला स्कूटरची पर्चेस विंडो खुली झाली, पण जरा थांबा! जुन्या जाणत्या कंपनीने सॉल्लिड स्कूटर आणलीय. टीव्हीएसने दोन दिवसांपूर्वी आयक्यूबची तीन अपडेटेड मॉडेल लाँच केली आहेत.

-हेमंत बावकर

ओलाच्या स्कूटर भविष्यातही जळत राहतील, असे वक्तव्य करून ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी पुढच्याच आठवड्यात ओलाच्या स्कूटरची पर्चेस विंडो खुली केली आहे. आजपासून पुढील काही दिवस ओलाची ईलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करता येणार आहे. लगेच तुटून पडू नका, थोडं थांबा. कारण जुन्या जाणत्या टीव्हीएसने आयक्यूबची रेंज ओलापेक्षाही वाढविली आहे. 

ओलाच्या एस१ प्रोची रस्त्यावरील खरीखुरी रेंज १३५ किमी आहे. परंतू टीव्हीएसच्या स्कूटरची रेंज १४५ किमी आहे. टीव्हीएसने दोन दिवसांपूर्वी आयक्यूबची तीन अपडेटेड मॉडेल लाँच केली आहेत. यामध्ये आयक्यूब एसटीची ऑन रोड रेंज १४५ किमी आहे शिवाय या कंपनीला दणकट स्कूटर बनविण्याचा अनुभवही आहे. सिंगल चार्जमध्ये संपूर्ण शहर फिरा! TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर ३ व्हेरिअंटमध्ये लॉन्च; पाहा फिचर्स अन् किंमत...ओलाच्या आजवर दोन स्कूटर पेटल्या आहेत. याचबरोबर जेव्हापासून लाँच केलीय तेव्हापासून क्वालिटीच्या शेकडो समस्या आहेत. ओला एस१ प्रोचा रिव्हर्समोड तर एवढा भयानक आहे की ज्यांनी याचे व्हिडीओ पाहिलेत ते हादरले आहेत. फिटिंग नीट नाहीय. अनेकांना एक, दोन दिवस गाडी उभी ठेवली तर बॅटरी उतरल्याची समस्या जाणवत आहे. अशा एक ना अनेक समस्या आहेत. शिवाय आता ही स्कूटर १.०८ लाखांना मिळत नाही. 

ओलाच्या स्कूटरची किंमत वाढली आहे. महाराष्ट्रात अर्ली बर्ड सबसिडी बंद झाली आहे. यामुळे ही स्कूटर तुम्हाला १.४० लाखांपर्यंत मिळते. कंपनीकडून समस्यांवर काहीच रिप्लाय येत नाही, काहीच मदत मिळत नाही म्हणून बीडमध्ये एकाने तर स्कूटरला आग लावली होती. औरंगाबादमध्ये एकाची स्कूटर तर मोडून पडली होती. यापेक्षा टीव्हीएस कंपनीचे शोरुम तुमच्या शहरात, आजुबाजुला आहेत. त्यांची सर्व्हिस सेंटरदेखील आहेत. यामुळे काही समस्या आलीच तर तुम्ही दुसऱ्या गाडीने निदान तिथे जाऊ तरी शकता. ओलाने अनेक प्रश्नांची उत्तरेच लोकांना दिलेली नाहीत. 

आणखी एक मोठी बाब म्हणजे ओलाचे एका मागोमाग बडे अधिकारी कंपनी सोडून जाऊ लागले आहेत. स्कूटरची डिलिव्हरी सुरु झाली तेव्हाच कंपनीला क्वालिटी हेड नोकरी सोडून गेला. या महिन्यात दोन बड्या अधिकाऱ्यांनी कंपनीला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे आताच सुरु झालेल्या या कंपनीत सारे काही आलबेल नाहीय. यामुळे ओलाच्या स्कूटरला तगडा पर्याय असलेल्या टीव्हीएस आयक्यूबचा विचार करता येऊ शकेल. 

TVS iQube ST: आयक्यूब एसटी टीव्हीएस मोटर डिझाइन 5.1kWh बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. यात सात इंचाची टीएफटी स्क्रीनसह जॉयस्टीक इंटरअॅक्टीव्हिटी, म्युझिक कंट्रोल, व्हीकल हेल्थ, 4G टेलिमॅटिक्स आणि OTA अपडेटसारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. यात नाइट थीम, पर्सनलायजेशन, व्हाइस असिस्ट आणि टीव्हीएस आयक्यूब अॅलेक्सा स्किलसेट देण्यात आली आहे. 

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर