नवी दिल्ली-
ओला इलेक्ट्रिक कंपनी भारतीय बाजारात आता आणखी एक टू व्हीलर लॉन्च करणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ओला इलेक्ट्रीक नवी एस-१ ई-स्कूटर लॉन्च करण्याची तयारी करत आहे. त्यासोबतच बहुप्रतिक्षीत ओला इलेक्ट्रिक कारबाबतही कंपनी महत्वाची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी ओलानं आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली होती. यावेळीही स्वातंत्र्य दिनाचंच औचित्य साधून कंपनी नवी स्कूटर बाजारात आणणार आहे.
ओला इलेक्ट्रिकचं ठरणार दूसरं प्रोडक्टरिपोर्टनुसार नवी स्कूटर ओला एस-१ च्या तुलनेत जास्त फिचर्स आणि रेंजसह लॉन्च होणार आहे. भारतीय बाजारात ओला इलेक्ट्रीकचं हे दुसरं प्रोडक्ट असणार आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनी आपल्या नव्या स्कूटरला Greenest EV असं म्हटलं आहे. कंपनीनं आपल्या सोशल मीडिया हँडलवरुनही नव्या स्कूटरबाबत माहिती दिली आहे तसंच तारीखही जाहीर केली आहे. कंपनीनं अद्याप स्कूटरच्या सर्व फिचर्सबाबत माहिती जाहीर केलेली नाही.
भाविश अग्रवाल यांनी शेअर केला टीझरओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी नुकतंच एक टिझर व्हिडिओ शेअर केला होता. यात त्यांनी १५ ऑगस्ट रोजी आम्ही Greenest EV सादर करत आहोत, असं म्हटलं आहे. टीझरमध्ये नव्या स्कूटरची झलक देखील पाहायला मिळत आहे. नव्या स्कूटरचं डिझाइन 'ओला एस-१ प्रो'शी मिळतं जुळतं दिसून येत आहे. ओला एस-१ प्रोचं हे अपडेटेड व्हर्जन असू शकतं असं म्हटलं जात आहे. पण कंपनी नेमकी कोणती स्कूटर लॉन्च करतेय हे आता १५ ऑगस्ट रोजीच कळू शकेल.
कशी असेल नवी ओलाची इलेक्ट्रिक स्कूटरसमोर आलेल्या माहितीनुसार ओलाची आगामी इलेक्ट्रीक स्कूटर OLA S1 Pro च्या तुलनेत कमीत कमी वीज खर्च होईल अशी इलेक्ट्रिक मोटर आणि छोट्या बॅटरी पॅकसह उपलब्ध करुन दिली जाऊ शकते. नव्या स्कूटरची किंमत ओला एसवन प्रोच्या तुलनेत कमी असू शकते. ओला एसवन प्रोमध्ये 3.97 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे.
कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार या बॅटरीमध्ये स्कूटर एकदा चार्ज केली केली की १८१ किमीची रेंज देईल. ओला एस वन प्रोची टॉप स्पीड ११५ किमी प्रतितास इतकी आहे. Ola S1 STD ची किंमत ९९,९९९ रुपये इतकी आहे. तर OLA S1 Pro ची किंमत १,३९,९९९ रुपये इतकी आहे.