OLA Future Factory Tour: ओलाच्या ईलेक्ट्रीक स्कूटरला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ग्राहक तेवढ्याच समस्यांनी देखील त्रस्त झाले आहेत. अशातच ओलाने आपल्या ५० हजारहून अधिक ग्राहकांना खास निमंत्रण पाठविले आहे. ओलाने बंगळुरूच्या फ्युचर फॅक्टरीची टूर करण्यासाठी बोलावणे धाडले आहे. आता या ग्राहकांचा यायचा जायचा खर्च कंपनी करणार की त्या ग्राहकांनाच करावा लागणार याचा अद्याप खुलासा झालेला नाही.
Ola S1 Pro Scooter Problems List: एक दोन नाहीत, ओला एस१ प्रोमध्ये २५ प्रॉब्लेम्स; ग्राहक सांगून सांगून वैतागलेओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून कंपनीच्या या प्लॅनबाबत माहिती दिली आहे. आधी ओला स्कूटरच्या १००० ग्राहकांना बोलविण्याचा प्लॅन होता. परंतू आता आम्ही ५० हजारहून अधिक ग्राहकांना ओला स्कूटर जिथे बनतात तिथल्या फ्युचर फॅक्टरीची सैर करविणार आहोत, असे ट्विट करण्यात आले आहे. कंपनी १९ जूनरोजी ओला स्कूटरचे OS2 सॉफ्टवेअरदेखील लाँच करणार आहे. याच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना बोलविण्यात आले आहे.
Ola S1 pro बाजारात आल्यापासूनची ही सर्वात मोठी सॉफ्टवेअर अपडेट असणार आहे. याद्वारे ग्राहकांना अनेक फिचर्स मिळणार आहेत. MoveOS2 मध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटी, नेविगेशन, क्रूज कंट्रोलसारखे फिचर्स असण्याची शक्यता आहे. कंपनीने म्हटले आहे की, जे फिचर्स आम्ही सांगितले होते व जे सध्याच्या स्कूटरमध्ये नाहीत, असे फिचर्स देण्यात येणार आहेत.
ओलाची स्कूटर घेतल्यापासून ग्राहकांना एक दोन नाहीत तर पंचवीसच्या वर समस्या येत होत्या. काही दिवसांपूर्वी तर एका ग्राहकाची ओलाच्या स्कूटरने चार चौघात चांगलीच फजिती केली होती. स्कूटरचा हॉर्न सतत अर्धा पाऊन तास वाजत होता. तो बंदत होत नव्हता, तर स्कूटर सुरु होत नव्हती. या ग्राहकाची ती अवस्था पाहून येणारे जाणारे देखील केविलवाण्या नजरने पाहत होते. अनेकांच्या स्कूटरचे तर पुढील फोर्क तुटल्याने चाक निखळून पडल्याच्या घटना घडला होत्या.