नवी दिल्ली : आतापर्यंत एमजी हेक्टरसारखी कारच फाईव्ह जी तंत्रज्ञानाने युक्त असल्याचे ऐकिवात होते. आता कारचा टायरही 5जी नेटवर्कने जोडलेला असणार आहे. यामुळे रस्त्याची तंतोतंत माहिती या टायरद्वारे मिळू शकणार आहे.
Ericsson, Audi, Tim, Italdesign आणि KTH सोबत पिरेलीने सेन्सर फिटेड सायबर टायरचे वाहन आणि 5G नेटवर्कशी संबंधित एक प्रदर्शन भरविले होते. टायर हा वाहन आणि रस्त्याशी संपर्कात असणारा एकमेव केंद्रबिंदू आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे टायर चालकासह वाहनालाही सूचना देऊ शकतो.
या पिरेलीच्या सायबर टायरमधील सेन्सर भविष्यात कारचे टायर मॉडेल, किमी क्लॉक, लादलेले वजन आणि रस्त्याच्या पृष्ठभागावरील समस्या, खड्डे एवढेच नाही तर रस्त्यावरील पाण्याची स्थिती आणि रस्त्यावरील ढीली झालेली पकडही सांगणार आहे.
तसेच हा टायर नेटवर्कमध्ये असलेल्या अन्य कारनाही सूचना करणार आहे. ही माहिती कारला नियंत्रण आणि ड्रायव्हिंगला मदत करणाऱ्या प्रणालींना रस्त्यानुसार बदलण्यास मदत करणार आहे.