देशात इलेक्ट्रीक स्कूटरचे मार्केट मोठ्या वेगाने वाढत असताना ब्रिटनचा मोठा तगडा गडी भारतात आला आहे. One-Moto (वन-मोटो) या ब्रिटीश ब्रँडने मोक्याच्या क्षणी भारतीय बाजारात एन्ट्री केली आहे. या कंपनीने हाय स्पीड इलेक्ट्रीक स्कूटर Electa (इलेक्टा) लाँच केली आहे. Electa Electric Scooter ही एक प्रमिअम श्रेणीमध्ये आणण्यात आली आहे. याची एक्स शोरुम किंमत 2 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. भारतीय बाजारात वन मोटोचे हे तिसरे उत्पादन आहे.
नोव्हेंबरमध्ये कंपनीने Commuta (कम्यूटा) आणि Byka (बायका) लाँच केल्या होत्या. Electa ही तिसरी हाय स्पीड स्कूटर आहे. तिन्ही स्कूटरना एकच अॅप सपोर्ट करते. याद्वारे जिओ फेन्सिंग, आयओटी आणि ब्ल्यूटूथ सारखी फिचर्स देण्यात आली आहेत. अन्य इलेक्ट्रीक स्कूटरपेक्षा ही स्कूटर तिच्या बॅटरीमुळे वेगळी आहे, कारण यामध्ये 72V आणि 45A डिटेचेबल लिथियम-आयन बॅटरी पॅक दिलेले आहे. ही बॅटरी चार तासांत चार्ज होते.
रंग आणि रेंजवन मोटो इलेक्टाला 5 रंगात आणण्यात आले आहे. यामध्ये मॅट ब्लॅक, शायनी ब्लॅक, ब्ल्यू, रेड आणि ग्रे रंग आहे. एकदा फुल चार्ज केली की ही स्कूटर 150 किमीचे अंतरा पार करू शकते. यास्कूटरमध्ये 4KW QS ब्रशलेस डीसी हब मोटर दिल्याने याचा टॉप स्पीड 100 किमी प्रति तास आहे.
दोन्ही चाकांना हाइड्रोलिक डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. मोटर, कंट्रोलर आणि बॅटरीवर तीन वर्षांची वॉरंटी आहे. ही स्कूटर 150 किलोचे वजन नेऊ शकते. म्हणजे 150 किलोपर्यंत वजनाचे दोघेजण या स्कूटरवर बसून आरामात प्रवास करू शकतात. बायकाची किंमत 1.80 लाख आणि कम्युटाची किंमत सर्वात स्वस्त म्हणजे 1.30 लाख रुपये आहे.