महिंद्रा कंपनी 11 ऑगस्ट रोजी नवी स्कॉर्पिओ क्लासिक सादर करत आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक 2022 ही एस आणि एस 11 सह दोन व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय ही 7 सीट आणि 9 सीट अशा कॉन्फिगरेशनसह येण्याची शक्यता आहे. नव्या महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 2.2-लिटर mHawk डिझेल इंजिन असेल. ते 137bhp आणि 319Nm एवढा टार्क जनरेट करेल.
फीचर्स -या नव्या महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये सहा क्रोम स्लॅट्ससह नवीन ग्रिल, महिंद्राचा नवा लोगो, फॉग लाइट क्लस्टरवर एलईडी डीआरएलसह एक नवा फ्रंट बम्पर, नवे ड्यूअल-टोन व्हिल्स आणि एक ट्विक्ड एलईडी टेल लाईट सेटअप असेल. हिची किंमत 10 लाख रुपयांपासून (एक्स शोरूम) सुरू होण्याची शक्यता आहे.
नव्या महिंद्रा स्कॉर्पिओ-N ची धूम -महिंद्राच्या फ्लॅगशिप SUV Scorpio-N ने बुकींगचा नवा विक्रम केला नोंदवला आहे. 30 जुलैला बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्याच मिनिटात हिचे 25,000 युनिट बूक झाले होते. तर 30 मिनिटांच्या आत 1,00,000 हून अधिक युनिटची बुकिंग झाली होती.
कंपनी न्यू महिंद्रा स्कॉर्पिओ-Nची डिलिव्हरी 26 सप्टेंबर, 2022 पासून सुरू करणार आहे. सुरुवातीला कंपनी हिचे 20,000 युनिट विकणार आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनी Z8L वेरिअंटला प्राधान्य देणार आहे. त्यांच्या डिलिव्हरीसंदर्भात कंपनी ग्राहकांना ऑगस्ट 2022 च्या आखेरीस माहिती देईल.