भारतीय बाजारात एमजी मोटर्स आपली दुसरी ईलेक्ट्रीक कार आणण्याची तयारी करत आहे. ही एन्ट्री लेव्हल कार असणार असून एमजी एअर ईव्ही असे या कारचे नाव असणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला एमजी या कारची विक्री सुरु होऊ शकते.
ही कार देशाती सर्वात स्वस्त कार ठरण्याची शक्यता आहे. सध्या टाटाची टियागो ईव्ही ही कार सर्वात स्वस्त आहे. एमजीची ही कार टियागोपेक्षाही छोटी असणार आहे. या कारला दोनच दरवाजे असणार आहेत. तीन मीटर लांबीची ही अनोखी कार तीने ते चार सीटर ऑप्शनमध्ये येऊ शकते. या कारची बॅटरी रेंज ३०० किमी असू शकते. टाटा टियागो ईव्हीची किंमती साडेआठ लाखांपासून पुढे ११.७९ लाखांपर्यंत आहे. याच प्राईजमध्ये एमजीची ही कार असेल. १० लाखांच्या आत या कारची किंमत असू शकते.
MG Air EV ला स्टँडर्ड व्हीलबेस आणि लाँग व्हीलबेस अशा दोन व्हेरिअंटमध्ये आणले जाऊ शकते. या कारची उंची १.६ मीटर आणि लांबी १.५ मीटर तसेच २.६ मीटर आणि ३ मीटर असेल. कारमध्ये मोठी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, डिजिटल इन्स्ट्रूमेंट कंसोल, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, वायरलेस कनेक्टीव्हीटीसह अनेक फिचर्स असतील.
महत्वाचे म्हणजे या कारमध्ये Tata AutoComp ची बॅटरी असण्याची शक्यता आहे. यामध्ये 30 kW आणि 50 kW ची बॅटरी पॅक मिळेल. या कारची बॅटरी रेंज २०० ते ३०० किमी असेल. एमजी एअर ईव्हीला सिंगल स्पीड ऑटोमॅटीक गिअरबॉक्ससोबत आणले जाईल. या दोन्ही कारना टक्कर देण्यासाठी भविष्यात अनेक कार येणार आहेत.