ऑटो इंडस्ट्री आणि सिआमच्या लेटेस्ट डेटानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारतातून पॅसेंजर वाहनांची निर्यात 43 टक्क्यांनी वाढली आहे. यात मारूती सुझुकी इंडिया 2.3 लाख हून अधिक यूनिटसह टॉपरवर आहे. आकडेवारीचा विचार करता, 2021-22 मध्ये एकूण पॅसेंजर वाहनांची निर्यात 5,77,875 युनिट एवढी होती. तर हा आकडा 2020-21 मध्ये 4,04,397 युनिट एवढा होता.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सिआम) च्या आकडेवारीनुसार, पॅसेंजर वाहन्यांच्या सेगमेंटमध्ये 42 टक्क्यांनी वाढ होऊन 3,74,986 युनिटचे निर्यात झाले. तर युटिलिटी वाहनांच्या सेग्मेंटमध्ये निर्यात 46 टक्क्यांनी वाढून 2,01,036 युनिटवर पोहोचली आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये व्हॅनची निर्यात वाढून 1,853 युनिटवर पोहोचली. गेल्या आर्थिक वर्षात, म्हणजेच 2020-21 मध्ये हा आकडा 1,648 युनिट एवढा होता. तज्ज्ञांच्या मते, मारुती सुझुकी इंडिया (एमएसआय) पहिल्या स्थानावर राहिली. तर यानंतर ह्युंदाई मोटर इंडिया आणि किआ इंडिया आहेत. एमएसआयने या दरम्यान 2,35,670 पॅसेंजर वाहनांची निर्यात केली. हे प्रमाण गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे.