ग्रेटर नोएडा येथील एक्सपो मार्टमध्ये ऑटो एक्सपो 2023 सुरू आहे. लोकांनी येथे एका चडी एक लक्झरी आणि इलेक्ट्रॉनिक गाड्या बघितल्या आहेत. या सर्व गाड्यांबरोबरच लोकांनी शत्रूला धडकी भरवणारी 'वीर'ही बघितली. ही कार सर्वांनाच आकर्षित करत होती. कारण ही इलेक्ट्रोनिक कार सीमेवर शत्रूवर मात करायचीही ताकद ठेवते. हिला इलेक्ट्रिक वाहन 'वीर' असे नाव देण्यात आले आहे. सीमेवरी जंगल भागांतील घुसखोरांपासून ते तस्करी करणाऱ्या शत्रूंपर्यंत आता ही कार सर्वांनाच धडकी भरवणार आहे. कारण आता लवकरच ही कार वन विभागाच्याही ताफ्यात सामील होणार आहे.
अशी आहे खासियत -सध्या या गाडीची ट्रायल सुरू आहे. महत्वाचे म्हणजे, इंडियन आर्मीमध्येही हिची ट्रायल सुरू आहे. जर हे ट्रायल यशस्वी झाले तर लष्करातही 'वीर'ची एन्ट्री होईल. लष्करात वीरची एन्ट्री झाल्यानंतर बरेच काही बदलू शकते. महत्वाचे म्हणजे, ही कार लष्करात आल्यास, सीमेवर लाइट लावण्याची आवश्यकता भासणार नाही, कारण हा काससोबत देण्यात आलेल्या नाईट व्हिजन कॅमेऱ्याने रास्ते आणि शत्रू दोघांवरही लक्ष ठेवता येऊ शकते, असा दावा केला जात आहे.
ऑटो एक्सपोमध्ये वीर दिसताच सर्वां जण थक्क झाले. सांगण्यात येते की, हे एक आत्याधुनिक आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहन आहे. एक चार्जवर ही कार 500 किलोमीटरपर्यंत चालू शकते. एवढेच नाही, तर ही कार 900 मिलीमीटर एवढ्या घोल पाण्यातही चालण्यास सक्षम आहे.
या इलेक्ट्रिक वीरला नाईट व्हिजन कॅमेरेही देण्यात आले आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी शत्रूवर नजर ठेवणे सोपे होईल. तसेच ही कार असल्यास रात्रीच्या वेळी अतिरिक्त लाईट्सचीही आवश्यकता नसते. ही कार तब्बल अडीच टन वजन ओढू शकते, यावरून हिच्या ताकदीचा अंदाज येऊ शकतो. या कारमध्ये लिफ्ट हुक्स शिवाय, वेपन माउंटदेखील देण्यात आले आहे. या कारमध्ये थर्मल जिंग कॅमेराही इंस्टॉल करण्यात आला आहे. या कारमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने एअर बॅग्स देखील आहे. ऑटो एक्सपोमध्ये इलेक्ट्रिक वीर आकर्षणाचे केंद्र बनले आहे.