जर तुम्ही अपघाती विमा म्हणजेच अॅक्सि़डेंटल इन्शुरन्स (Accidental Insurance) काढण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एचडीएफसी (HDFC) बँकेने अपघाती विमा नाकारताना हैराण करणारे कारण दिले आहे. हे प्रकरण पंजाबच्या लुधियाना येथील आहे.
हरवंश कौर यांनी आपल्या कुटुंबातील एका सदस्याच्या मृत्यूनंतर अपघात विमा क्लेम केला होता. जो एचडीएफसी बँकेने नाकारला आहे. दिल्लीचे राजीव मेहता यांनी एचडीएफसीने पाठविलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. या पत्रात हरवंश कौर यांना क्लेम का नाकारला याचे कारण दिले आहे.
पत्रानुसार इन्शुरन्स पॉलिसी घेणाऱ्याचा मृत्यू 19 एप्रिल 2020 ला रस्ते अपघातात झाला होता. यावेळी तो 346 सीसी बाईकवर होता. बँकेनुसार या क्लेममध्ये हे येत नाही. मृतक अपघातावेळी 346 सीसी बाईकवर होता. अपघात विमा पॉलिसीमध्ये एक नियम आहे, रस्ते अपघात झाला आणि जर ती स्कूटर किंवा बाईक असेल तर 150 सीसीपेक्षा कमी क्षमतेची असेल तरच त्याचा क्लेम मिळतो. अन्यथा क्लेम मिळत नाही.
अपघात विमा काय असतो...अपघात विमा घेणाऱ्या व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर त्याच्या कुटुंबाला एकरकमी विम्याचे पैसे मिळतात. परंतू अनेकदा या कंपन्या किंवा बँका ही विम्याची राशी देण्यास काही ना काही कारण दाखवून टाळाटाळ करतात किंवा नियम दाखवून कमी रक्कम देतात. यामुळे अशा प्रकारचा विमा काढताना पॉलीसीवर असलेल्या अटी आणि शर्थी वाचणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्या अपघातानंतर वर्षानुवर्षे पैसे भरूनही कुटुंबाच्या हाती काही मिळत नाही.