प्रदूषण विरहीत वाहतूकीच्या दृष्टीकोनातून सध्या इलेक्ट्रिक वाहनांना चांगलीच मागणी वाढली आहे. त्यात इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे लोकही आता इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रस दाखवू लागले आहेत. जवळपास प्रत्येक मोठी कार निर्माती कंपनी आपले इलेक्ट्रिक मॉडल बाजारात दाखल करत आहे. पण इलेक्ट्रिक वाहनाची जास्त किंमत एक मोठा अडसर ठरत आहे. अशातच मुंबईतील एका स्टार्टअप कंपनीनं स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी केली आहे. मुंबईतील PMV Electric स्टार्टअप कंपनी भारतीय बाजारपेठेत ४ लाख रुपये किमतीची इलेक्ट्रिक कार आणत आहे.
PMV Electric कंपनीनं आपल्या इलेक्ट्रिक कारनं नाव EaS-E असं ठेवलं आहे. पावर आणि स्पेसिफिकेशनबाबत बोलायचं झालं तर EaS-E मध्ये अॅडव्हान्स लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी देण्यात आली आहे. कार पूर्ण चार्ज झाली की १६० किमी रेंज देऊ शकते असा दावा कंपनीनं केला आहे. तर कमीत कमी चार तासांत कार पूर्णपणे चार्ज होते. टॉप स्पीडबाबत बोलायचं झालं तर 70Kmph ची स्पीड मिळते.
कारचं आकर्षक डिझाइन हे वैशिट्य आहे. ही कार 2915 mm लांब, 1157mm रुंद आणि उंची 1600mm असणार आहे. कारचा ग्राऊंड क्लिअरन्स 170mm आहे. तर वजन 575 किलो इतकं आहे. फ्रंट डिस्क ब्रेक आणि रिअरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.
EaS-E चे फिचर्सफिचर्सबाब बोलायचं झालं तर कारमध्ये EaS-E मोड, क्रूज कंट्रोल, रिमोट पार्किंग असिस्ट, रिमोट कनेक्टिव्हिटी आणि डायग्लॉस्टिक, स्टिअरिंग माऊंडेट कंट्रोल, सेफ्टी बेल्ट, LCD डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, रिमोट कीलेस एन्ट्री, पावर विंडो, इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल मिरर्स, रिव्हर्स व्ह्यू कॅमेरा, एसी, LED हेडलॅप्स देण्यात आले आहेत.