इलेक्ट्रीक स्कूटर म्हटले लाख-दीड लाखाच्या पुढेच बोलायचे असे ओला, टीव्हीएससारख्या कंपन्यांच्या स्कूटरच्या किंमतींवरून लोकांचा समज झाला आहे. आता पेट्रोलवरील साठी ज्युपिटर किंवा अॅक्टिव्हा जरी घ्यायची म्हटली तरी ती ९५ हजारापासून सुरु होते. यामुळे इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये पैसे टाकणे लोकांना परवडू लागले आहे.
जर तुमचे बजेट ७० हजारापर्यंतचे आहे, तर तुम्ही नवी कोरी चांगल्या कंपनीची इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करू शकता. हिरो इलेक्ट्रिक NYX HX इलेक्ट्रिक स्कूटर 70 हजारांखालील इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत येते. हिरो ही जुन्या हिरोची दा वर्षांपूर्वी वेगळी झालेली कंपनी आहे. या स्कूटरची अनुदानासह किंमत 67,540 एक्स-शोरूम दिल्ली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 165 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. तर टॉप स्पीड 42 किमी प्रतितास आहे, तर चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात.
दुसरी स्कूटर ही Ampere Magnus आहे. ही देखील चांगली कंपनी आहे. या स्कूटरला मोठी बुट स्पेस आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलरचा टॉप स्पीड 53 किमी प्रतितास आहे. डिटेचेबल बॅटरी देण्यात आली आहे. चार्ज होण्यासाठी 5-6 तास लागतात. एका चार्जवर 121 किमी पर्यंत चालवता येते. रिमोट कीलेस एंट्री, एलईडी लाईट्ससह मोठी बूट स्पेस, स्मार्टफोनसाठी यूएसबी चार्जर, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन दिलेले आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 66,520 रुपये (एक्स-शोरूम) दिल्ली आहे.
तिसरी देखील स्कूटर याच कंपनीची आहे. Ampere Zeal Ex ही एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर आहे. एका चार्जवर ती १२१ किमीचे अंतर कापते. टॉप स्पीड ५५ किमी प्रतितास आहे. सबसिडीसह अँपिअर झील इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 60,520 रुपये एक्स-शोरूम दिल्ली आहे. 11 सेकंदात 0-45km/ताशी वेग पकडते. तर चार्जिंगसाठी 5-6 तास लागतात.