शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

BMW च्या 'या' इलेक्ट्रिक कारला दमदार प्रतिसाद, पहिल्याच दिवशी बुक झाल्या सर्व कार; जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 4:23 PM

कंपनीने सांगितल्यानुसार, पुढच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत या कारची डिलीव्हरी मिळेल. तसेच, पुढील बुकिंग येत्या वर्षाच्या सुरुवातीला होईल.

BMW कारच्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या कारचे सर्व युनिट्स विकल्या गेले आहेत. आज (14 डिसेंबर) ही माहिती देताना कंपनीने सांगितले की, त्यांच्या BMW iX इलेक्ट्रिक SAV (स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी व्हेईकल) ची पहिली खेप पहिल्याच दिवशी म्हणजेच लॉन्चच्या दिवशी विकली गेली. ही SAV सोमवारी कंपनीने लॉन्च केली होती.

कधी मिळणार डिलीव्हरीकंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, बुकिंगच्या पहिल्या टप्प्याला ग्राहकांचा ऑनलाइन आणि देशभरात पसरलेल्या BMW इंडिया डीलरशिपद्वारे जबरदस्त प्रतिसाद मिळाला. पुढील वर्षी एप्रिल 2022 पासून या गाड्यांची डिलिव्हरी सुरू होईल. ही कार भारतात कम्प्लीली-बिल्ट-अप युनिट(CBU) म्हणून लॉन्च करण्यात आली होती. या कारची किंमत 1.15 कोटी रुपये (एक्स-शोरुम) आहे.

पुढील टप्प्यासाठी बुकिंग मार्च 2022 च्या तिमाहीत सुरू होईलया कारची पहिली खेप पूर्णपणे सोल्ड आउट झाली आहे. आता ही कार घेण्यासाठी इतर ग्राहकांना काहीकाळ वाट पाहावी लागणार आहे. कंपनीने सांगितल्यानुसार, दुसऱ्या टप्प्याचे बुकिंग पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी-मार्च 2022 मध्ये सुरू होईल. BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावग यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यात BMW iX च्या यशाबद्दल त्यांना खात्री होती, परंतु पहिल्या दिवशी ग्राहकांच्या प्रतिसाद मिळेल, हे माहित नव्हतं. यानंतर आता कंपनीने पुढील टप्प्यांच्या बुकिंगची तयारी सुरू केली आहे.

BMW iX चे वैशिष्ट्ये

  • BMW iX ला जागतिक स्तरावर दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहे.iX xDrive 40 आणि iX xDrive 50. परंतु, भारतात फक्त याचे iX xDrive 40 व्हेरिएंट लॉन्च करण्यात येणार आहे. 
  • xDrive 40 व्हेरिेंट 326 hp पॉवर आणि 630 Nm पीक टार्क जनरेट करू शकते.
  • xDrive 40 व्हेरिएंटला ताशी 0-100 किमीचा वेग मिळवण्यासाठी 6.1 सेकंदाचा वेळ लागतो.
  • BMW iX मध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर(प्रत्येक एक्सलवर एक) दिली आहे, तर एक ऑल-व्हील-ड्राइव सिस्टीम स्टँडर्डदेण्यात आला आहे. याचा वापर प्यिओर रअयर-व्हील-ड्राइव सेट-अपमध्ये केला जाऊ शकतो.
  • ड्रायविंग रेंजबद्दल बोलायचे झाले तर, ही xDrive 40 एका चार्जिंगमध्ये 425 किमी चालू शकते.
  • 150 kW DC फास्ट चार्जरच्या मदतीने या गाडीला फक्त 31 मिनीटांत 10 ते 80 चार्ज करता येते. 
टॅग्स :AutomobileवाहनElectric Carइलेक्ट्रिक कारBmwबीएमडब्ल्यू