शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

मोटारीत उन्हापासून बचाव करण्यासाठी करा सनवायझरचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2017 6:00 PM

कारमध्ये काच लावल्यानंतर उन्हाचा त्रास होतो म्हणून डार्क फिल्म लावली गेली, कायद्याने आज या फिल्मवर बदी असल्याने त्या फिल्मऐवजी काळ्या रंगाच्या सच्छीद्र कापडाला एका तारेच्या चौकटीमध्ये बंदिस्त केले

ठळक मुद्देकारच्या आतील बाजूने ही सनशेड् बसते. तुम्हाला हवी तेवा ती काढता येते, फोल्डही करता येतेतुम्हाला तुमच्या कारच्या मॉडेलनुसार त्या कारला असलेल्या काचेच्या व खिडकीच्या आकारानुसार मिळतात.पडदा लावण्यापेक्षा हा प्रकार जास्त सुलभ व सोयीस्कर आहे.

उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी माणसाने काय काय प्रकारची साधने शोधली आहेत, ते पाहिले तर नवलच वाटावा. घर बांधल्यानंतरही खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी माणसाने पडद्यांचा शोध लावला. मग पडद्यापेक्षाही जास्त प्रभावी अशा काचांचा शोध लावला. विशिष्ट प्रकारची घरबांधणी करूनही पाऊस, उन,थंडी अशांपासून माणसाने संरक्षण करून घेतले. गरज ही या शोधांची जननी म्हणतात, ते उगीच नाही. कारमध्ये काच लावल्यानंतर उन्हाचा त्रास होतो म्हणून डार्क फिल्म लावली गेली, कायद्याने आज या फिल्मवर बदी असल्याने त्या फिल्मऐवजी काळ्या रंगाच्या सच्छीद्र कापडाला एका तारेच्या चौकटीमध्ये बंदिस्त केले व हवेचा दाब काचेवर देऊन त्याद्वारे ती काळ्या कापडाची चौकट काचेला घट्ट बसेल म्हणून सनवायझर - सनशेड तयार केली गेली. त्यातही पुढे शोध लागले व त्या चौकटीला मॅग्नेट्स म्हणजे लोहचुंबक लावून कारच्या खिडकीला ती सहजपणे घट्ट पकडून बसतील अशी सनशेड सध्या बाजारात दिसू लागली आहे. अगदी सहज सोपा उपाय आहे खरा पण तो शोध आपल्यापयर्ंत पोहोचायला इतका काळ जावा लागला.

कारच्या आतील बाजूने ही सनशेड् बसते. तुम्हाला हवी तेवा ती काढता येते, फोल्डही करता येते. बाहेरच्याला आतील झटकन दिसत नाही, मात्र तुम्ही कारमधून बाहेरचे सारे कारी कडक उन असले तरी गॉगलमधून पाहिल्यासारखे पाहू शकता. अशा प्रकारची छोटी छोटी साधने आज कारमध्ये खरोखर उपयुक्त आहेत. पूर्वी ती पाढऱ्या वा काळ्या रंगाच्या बुचासारख्या एका कॅपने काचेवर हवेच्या दाबाच्या सहाय्याने बसत होती. काही वेळाने हवेचा दाब कॅपमधून कमी अधिक झाला की ती बुच सनशेडला पाडून टाकत. मात्र ती पुन्हा काचेवर लावावी लागत आता त्या पद्धतीचीही सनशेड येतात व मॅग्नेटिक पद्धतीचीही येतात. ही मॅग्नेटिक पद्धतीची सनशेड नक्कीच उपयुक्त आहेत. तुम्हाला तुमच्या कारच्या मॉडेलनुसार त्या कारला असलेल्या काचेच्या व खिडकीच्या आकारानुसार मिळतात. खिडकीला आतील बाजूने अतिशय चपखलपणे बसतात व लोहचुंबकीय पट्टीमुळे कारच्या लोखंडी भागाला ती घट्ट बसतात. काळ्या रंगाच्या कापडाप्रमाणेच अन्य रंगाच्या वा प्रकारच्या कापडातही ती बनवता येतात. कापड वा सिंथेटिक प्रकारातही ती बाजारात उपलब्ध आहेत.

काळ्या फिल्म लावून कायदा मोडून सूर्यप्रकाशाच्या कडक किरणांपासून प्रवासात सावली देणारी ही साधने उपयोगाची नक्कीच आहेत.कारच्या बाजूच्या चारही काचांसाठी ती लावता येतात. बाहेरच्या बाजूने पाहाताना आतील व्यक्ती झटकन दिसत नाही. पडदा लावण्यापेक्षा हा प्रकार जास्त सुलभ व सोयीस्कर आहे. पुन्हा कारला मॅच होणारी रंगसंगती म्हणून काळ्या रंगातही ती चालून जातात. मॅग्नेटिक पट्टीचा वापर केल्याने सनशेड अधिकच उपयुक्त व सोयीची झालेली आहेत.

टॅग्स :Automobileवाहनcarकार