पुणे : क्लासिक लिजंड्स प्रा. लि. नेभारतातील आपल्या पहिल्या दोन जावा मोटरसायकल्स डीलरशीप्स पुण्यात सुरू होत असल्याची घोषणा केली आहे. देशभरात लवकरच सुरू होणाऱ्या 100 हून अधिक मोटरसायकल्स डीलरशीपमधील ही पहिलीच आऊटलेट आहेत. ही आऊटलेट आता पूर्णपणे कार्यरत झाल्याने पुण्यातील ग्राहकांना ख्यातनाम जावा आणि जावा फोर्टी टू या मोटरसायकल्स बुक करता येतील आणि त्यांची टेस्ट ड्राइव्हही घेता येईल. या डीलरशीप्स बाणेर आणि चिंचवड येथे सुरू करण्यात आल्या आहेत.
गडद रंगातील लाकडी जोडणी, सुक्ष्म बारकावे, रॉ टेक्सचर्स आणि कापडाची विंटेज ऑक्सब्लड शिवण अशा वैशिष्ट्यांमधून कलाकुसर आणि साहित्यातील प्रामाणिकपणा जपणाऱ्या सुवर्ण काळाची सफर घडवणारी सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे. त्याचवेळी, क्लासिक डिझाइनमधील आधुनिक दृष्टिकोन आणि त्याला देण्यात आलेली आधुनिक इंजिन तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांची जोड यामुळे ही मोटरसायकल समकालीनतेत भर घातले.
रुस्तमजीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. बोमन इराणी यांनी क्लासिक लेजंड्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने आलेल्या जावाप्रेमी आणि ग्राहकांच्या उपस्थितीत या शोरूमचे उद्घाटन केले.जावा आणि जावा फोर्टी टू मोटरसायकल्समुळे क्लासिक जावाला रेट्रो-कूल असे नवे रुप मिळाले आहे. या मोटरसायकल्स या ब्रँडच्या नव्या शिलेदार आहेत. या आधुनिक बाइक्समध्ये कार्यक्षमता, क्षमता आणि दर्जा यांचा समतोल साधणारी अस्सल जावाची वैशिष्ट्ये आहेत. संपूर्ण नव्या 293 सीसी, लिक्विड कुल्ड, सिंगल सिलेंडर, डीओएचसी इंजिनला डबल क्रॅडल चॅसिसची जोड मिळाल्याने ही बाइक उत्तमरित्या हाताळली जाते आणि या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट स्थिरता यामध्ये असल्याने नवी जावा खऱ्या अर्थाने आधुनिक क्लासिक बाइक ठरते.
जावा आणि जावा फोर्टी टू यांची किंमत अनुक्रमे 1.65 लाख आणि 1.56 लाख (एक्स-शोरूम, पुणे) इतकी आहे आणि बुकिंग्स आता www.jawamotorcycles.com इथे आणि शोरूममध्ये सुरू आहेत.बाणेर आणि चिंचवड स्टेशनजवळ हे दोन शोरुम आहेत.