नवी दिल्ली : सध्या भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमधील आणखी एक नवीन एन्ट्री म्हणजे प्युअर ईव्ही इकोड्राफ्ट (Pure EV EcoDryft). हैदराबादमधील इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी PURE EV ने सादर केली आहे.
PURE EV EcoDryft सादर करण्यासोबतच कंपनीने बाईकची टेस्ट ड्राइव्ह देखील ग्राहकांसाठी खुली केली आहे. दरम्यान, कंपनीने अद्याप PURE EV EcoDryft लाँच तारीख आणि किंमत जाहीर केलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही बाईक जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या 2023 ऑटो एक्सपोमध्ये लाँच केली जाऊ शकते.
PURE EV EcoDryft Battery and MotorPure EV ने या इलेक्ट्रिक बाइकमध्ये 3.0 kWh क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक बसवला आहे. हा बॅटरी पॅक AIS 156 प्रमाणित आहे. कंपनीने या बॅटरीमध्ये बसवलेल्या मोटरची पॉवर आणि स्पेसिफिकेशन सार्वजनिक केलेले नाही.
PURE EV EcoDryft Range and Top SpeedPure EV EcoDrift च्या रेंज आणि टॉप स्पीडबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही बाईक एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 135 किमीची राइडिंग रेंज देईल आणि या रेंजसोबत 75 किमी प्रति तासाचा टॉप स्पीड देखील मिळतो.
PURE EV EcoDryft Colors and DesignPure EV EcoDrift च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, ती एक बेसिक कम्युटर बाइकसारखी दिसते. या बाईकमध्ये अँगुलर हेडलॅम्प, पाच स्पोक अलॉय व्हील, सिंगल पीस सीट, आकर्षक डिझाईनची इंधन टाकी, ज्यामध्ये स्टोरेज उपलब्ध आहे. कलर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने ही बाईक ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड या चार कलर थीमसह आणली आहे.
PURE EV EcoDryft Braking and Suspensionबाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल सांगायचे तर, कंपनीने बाईकच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक लावले आहेत, ज्यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. सस्पेन्शन सिस्टीममध्ये, समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि मागील बाजूस स्प्रिंग बेस्ड शॉक ऍब्जॉर्बर सस्पेन्शन आहे.
PURE EV EcoDryft Rivalsएकदा बाजारात आल्यावर PURE EV EcoDryft इलेक्ट्रिक बाईकची स्पर्धा Revolt RV400, Tork Kratos आणि Oben Rorr सोबत होईल.