Pure EV EPluto 7G : सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे (Petrol Diesel Price Hike) सध्या ग्राहक अन्य पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. इतकंच काय तर आता इलेक्ट्रीक गाड्यांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, हैदराबादची स्टार्टअप कंपनी Pure EV नं आपली जबरदस्त Pure EV EPluto 7G इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली होती. दरम्यान, या स्कूटरमध्ये 120 किमीची रेंज मिळते. शिवाय 2900 रुपयांच्या ईएमआयवरही तुम्ही ही स्कूटर खरेदी करू शकता.EPluto 7G ही स्कूटर कंपनीच्या सर्वात प्रीमिअम स्कूटरपैकी एक आहे. यामध्ये 1.5KW ची मोटर आणि 2.5kWh ची लिथियम आयर्न बॅटरी देण्यात आली आहे. संपूर्ण चार्जमध्ये ही स्कूटर 90 ते 120 किमीची रेंज देते. या स्कूटरचा सर्वाधिक वेग 60KMPH इतका आहे. तसंच 0-40 किमीचा वेग पकडण्यासाठी या गाडीला केवळ 5 सेकंद लागत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. ही स्कूटर फुल चार्ज होण्यास 5-6 तासांचा कालावधी लागतो.काय आहेत फीचर्स?या इलेक्ट्रीक स्कूटरचं डिझाइन बऱ्यापैकी Vespa प्रमाणे आहे. यामध्ये क्रोम फिनिश्ड मिररसोबत गोल हेडलँप देण्यात आलाय. यात 5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले, एलइडी हेडलँप, एन्टी थेफ्ट सिस्टमसह स्मार्ट लॉक देण्यात आलंय. या स्कूटरचं कर्ब वेट जवळपास 76 किलो आहे. यामध्ये 10 इंचाच्या अलॉय व्हिल्ससह डिस्क आणि ड्रम ब्रेक्स देण्यात आलेत.
किती आहे किंमत?या स्कूटरची एक्स शोरुम किंमत 83,999 रुपये आहे. ही स्कूटर तुम्हाला 2,891 रुपयांच्या ईएमआयवर विकत घेऊ शकता. या स्कूटरची स्पर्धा Okinawa Praise आणि Ampere Magnus Pro यासारख्या इलेक्ट्रीक स्कूटर्सशी आहे. ही स्कूटर रेड, ब्लॅक, ब्लू, ग्रे, व्हाईट आणि येलो कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.