नवी दिल्ली : सध्या भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. दरम्यान, यातच एक प्युअर ईव्ही प्लुटो 7G ची (PURE EV Epluto 7G) इलेक्ट्रिक स्कूटर आहे. जर तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर PURE EV Epluto 7G चे संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या...
PURE EV Epluto 7G PricePure EV Epluto 7G ची सुरुवातीची किंमत 92,999 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि या इलेक्ट्रिक स्कूटरची ऑन-रोड किंमत 97,125 रुपये आहे.
PURE EV Epluto 7G Battery and MotorPure EV ने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.5 kWh क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक बसवला आहे, ज्यामध्ये BLDC इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे. बॅटरी चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर हा बॅटरी पॅक 4 तासांत फूल चार्ज होतो.
PURE EV Epluto 7G Range and Top Speedराइडिंग रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एकदा फूल चार्ज केल्यानंतर 90 ते 120 किलोमीटरची रेंज देते. या रेंजसह, कंपनी 60 किमी प्रतितास इतका स्पीड मिळवण्याचा दावा करण्यात आला आहे.
PURE EV Epluto 7G Braking and SuspensionEV Epluto 7G च्या फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक बसवण्यात आला आहे. तसेच, रिअर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक मिळतो. ज्यासोबत कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. सस्पेन्शन सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर स्कूटरच्या फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि रिअरमध्ये स्प्रिंग बेस्ड शॉक ऍब्जॉर्बर सिस्टीम आहे.
PURE EV Epluto 7G Featuresफीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Pure EV Epluto 7G मध्ये, कंपनीने डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर, डिजिट ट्रिप मीटर, अँटी थेफ्ट अलार्म, अँटी थेफ्ट स्मार्ट लॉक, ट्विस्ट थ्रॉटल, रिफ्लेक्टर, लेफ्ट अँड राइट ब्लिंकर्स, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प आणि लो बॅटरी इंडिकेटर यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.