Pure EV etryst 350 Price and Features: इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी Pure EV ने भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक Pure EV Etryst 350 लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईकला अगदी पेट्रोल बाईकप्रमाणे लूक दिला आहे. विशेष म्हणजे, ही बाईक 140 किमीची रेंज देते. स्पीडमध्येही ही एखाद्या पेट्रोल बाईकच्या तोडीस तोड आहे. कंपनीने तीन कलर ऑप्शन- ब्लू, ब्लॅक आणि रेडमध्ये ही लॉन्च केली आहे. 'मेक इन इंडिया' अंतर्गत हैदराबादमध्ये या बाईकचे डिझाइन, डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरींग झाली आहे.
140KM ची रेंजPure EV ETRYST 350 इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये 3.5kWh बॅटरी दिली आहे. एका चार्जिंगमध्ये ही बॅटरी 140 किमीपर्यंतची रेंज देते. विशेष म्हणजे, बाईकची टॉप स्पीड 85 किमी प्रति तास आहे. तसेच, या गाडीची लोड कपॅसिटी 150 किग्रा आहे. कंपनी या बाईकमध्ये दिलेल्या इन-हाउस बॅटरी पॅकवर 5 वर्षे/50 हजार किमीची वारंटी देत आहे. कंपनीचा दावा आहे की, ETRYST 350 इलेक्ट्रिक मोटरसायकलचा परफॉर्मेंस 150cc मोटरसायकलच्या तोडीस तोड असेल.
किंमत किती..?मिळालेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत 154,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. सुरुवातीला ही बाईक मेट्रो सिटी आणि टियर-1 शहरांमध्ये उपलब्ध होईल. याची विक्री कंपनीच्या 100 डीलरशिपद्वारे होईल. या बाईकमध्ये तीन ड्राइव्ह मोड- ड्राइव्ह, क्रॉसओवर आणि थ्रिल मिळेल. ड्राइव्ह मोडमध्ये याची रेंज 60KM, क्रॉसओव्हरमध्ये 75KM आणि थ्रिलमध्ये 85KM पर्यंत असेल.