नवी दिल्ली : बजाज ऑटोचे कार्यकारी अध्यक्ष राहुल बजाज पद सोडणार आहेत. त्यांचा कार्यकाळ 31 मार्च 2020 ला संपणार असून रतना टाटांच्या पावलावर पाऊल ठेवणार आहेत. म्हणजेच बजाज ग्रुपच्या कोणत्याही निर्णयामध्ये ते थेट सहभाग घेऊ शकणार नाहीत. गेल्या 50 वर्षांपासून त्यांनी बजाजची धुरा सांभाळली होती.
बजाज ऑटोने आज ही माहिती दिली आहे. बोर्डने त्यांना एप्रिल 2015 मध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा होता. कंपनीने सांगितले की, काही कारणांमुळे त्यांनी कंपनीचा संचालक म्हणून काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
बजाज ऑटोच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी राहुल बजाज यांना नॉन-एग्जीक्यूटिव डायरेक्टर म्हणून मंजुरी दिली आहे. त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 पासून सुरू होणार आहे. सेबीच्या नियमांनुसार त्यांच्या नियुक्तीसाठी शेअर धारकांकडून पोस्टल मतदान घेण्यात येणार आहे.
राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज ग्रुपची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वात कंपनीचा व्यवसाय 7.2 कोटींवरून 12 हजार कोटींवर गेला होता. ही स्कूटर विकणारी आघाडीची कंपनी होती. 2005 मध्ये राहुल यांनी त्यांच्या मुलाकडे जबाबदाऱ्या देण्यास सुरूवात केली. राजीव बजाज यांना व्यवस्थापकीय संचालक बनविले होते.