Range Rover And Rolls-Royce EMI Calculator: जगातील सर्वात महागड्या गाड्यांमध्ये Rolls-Royce ची गणना केली जाते. या ब्रँडच्या कार आपल्या भारतातदेखील खूप लोकप्रिय आहेत. पण, रोल्स रॉईस खरेदी करणे, सामान्य कुटुंबातील व्यक्तीसाठी खूप कठीण काम आहे. दरम्यान, Land Rover रेंज रोव्हर हीदेखील भारतातील लोकप्रिय कार आहे. पण, या कंपनीच्या गाड्यादेखील खूप महाग आहेत.
रेंज रोव्हरची किंमत रोल्स रॉयसच्या तुलनेत खूप कमी आहे. पण रेंज रोव्हर खरेदी करणेही सर्वसामान्यांसाठी अवघड आहे. एखाद्या व्यक्तीला हे वाहने खरेदी करायचेच असेल, तर तो डाउन पेमेंट भरुन EMI वर ही लक्झरी कार खरेदी करू शकतो.
रोल्स रॉयस कशी खरेदी करावी?Rolls-Royce Cullinan चे नवे मॉडेल नुकतेच भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहे. भारतातील या ब्रँडची ही सर्वात महागडी कार आहे. Rolls-Royce Cullinan ची किंमत 10.50 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 12.25 कोटी रुपयांपर्यंत जाते. Rolls-Royce Cullinan खरेदी करण्यासाठी तुम्हाला 10.85 कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल.
Cullinan खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1.20 कोटी रुपये डाऊन पेमेंट म्हणून जमा करावे लागतील. बँकेने कार लोनवर 9 टक्के व्याज आकारले आणि तुम्ही बँकेकडून चार वर्षांसाठी कर्ज घेतले, तर तुम्हाला दर महिन्याला बँकेत 27 लाख रुपये EMI जमा करावा लागेल. तर, तुम्ही हे कर्ज सहा वर्षांसाठी घेतल्यास, तुमचा EMI दरमहा 19.57 लाख रुपये होईल.
Land Rover Range Rover कशी खरेदी करावी?भारतीय बाजारपेठेत रेंज रोव्हरची अनेक मॉडेल्स आहेत. या वाहनाच्या 2.0-लीटर डायनॅमिक एसई डिझेल व्हर्जनची ऑन-रोड किंमत 78.21 लाख रुपये आहे. रेंज रोव्हरचे हे व्हर्जन खरेदी करण्यासाठी 70.40 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल.
ही कार खरेदी करण्यसाठी कारच्या किमतीच्या 10 टक्के, म्हणजे 7.82 लाख रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल. तुम्ही चार वर्षांसाठी कर्ज घेतले आणि या कार कर्जावर बँक 9 टक्के व्याज आकारत असेल, तर तुम्हाला दरमहा 1.75 लाख रुपये EMI भरावा लागेल. जर तुम्ही हे कर्ज सहा वर्षांसाठी घेतले, तर तुम्हाला दरमहा 1.27 लाख रुपये 9 टक्के व्याजाने बँकेत भरावे लागतील. महत्वाचे म्हणजे, कार कर्जावर आकारले जाणारे व्याज बँकेनुसार, वेगळे असू शकते.