Ratan Tata:टाटा समुहाचे प्रमुख रतन टाटा यांचे नाव जगभरात आदराने घेतले जाते. रतन टाटा अनेकांसाठी एक प्रेरणा आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे, यानिमित्त अनेकजण त्यांना दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, टाटांच्या आयुष्यात घडलेल्या काही घटना, अनेकांना एक वेगळीच उर्जा देतात. अशीच एक घटना 1998 ला घडली होती. टाटा मोटर्सने देशातील पहिली स्वदेशी कार ''टाटा इंडिका'' लाँच केली होती.
टाटांचा ड्रीम प्रोजेक्टइंडिका रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. दुर्दैवाने त्यांना यश मिळाले नाही आणि कंपनी प्रचंड तोट्यात गेली. टाटा मोटर्सने वर्षभरात आपला कार व्यवसाय विकण्याचा निर्णय घेतला. 1999 मध्ये टाटांनी अमेरिकेतील मोठ्या कार कंपनी फोर्डशी करार करण्याचा निर्णय घेतला. करार करण्यासाठी रतन टाटा त्यांच्या टीमला घेऊन अमेरिकेत गेले. फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड यांच्यासोबत बैठक होणार होती.
बैठकीत टाटांचा अपमानबैठकीत बिल टाटा यांना म्हणाले, “पॅसेंजर कार डिव्हिजन सुरू करण्यासाठी तुम्हाला अनुभव आणि ज्ञान नव्हते, मग तुम्ही हा निर्णय का घेतला. तुम्ही हा व्यवसाय सुरू करायचा नव्हता." यासोबतच, करार करून ते टाटांवर उपकार करत आहेत, असेही फोर्ड म्हणाले होते. टाटांसाठी हा मोठा अपमान होता. यानंतर टाटांनी हा करार न करण्याचा निर्णय घेतला.
काळाचे चक्र फिरले अन्काही वर्षातच काळाचे चाक फिरले आणि त्यानंतर जे घडले, ते कायम स्मरणात राहणार आहे. 9 वर्षांनंतर परिस्थिती खूप बदलली होती. वर्ष 2008 आले. जागतिक मंदीच्या त्या काळात अमेरिकन कंपनी फोर्ड दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली. यानंतर रतन टाटा यांनी फोर्डचे दोन लोकप्रिय ब्रँड 'जग्वार' आणि 'लँड रोव्हर' खरेदी करण्यात रस दाखवला. टाटांवर 9 वर्षापूर्वीच्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली होती. पण, टाटांची संस्कृती तशी नव्हती, त्यांनी फोर्डचे दोन ब्रँड विकत घेत, कंपनीवर मोठे उपकार केले.
टाटांनी केले मोठे उपकारबुडत्याला काडीचा आधार असतो, मग फोर्डसमोर उभी असलेली व्यक्ती तर भारतातील एक मोठा ब्रँड होती. जून 2008 मध्ये, रतन टाटा यांनी फोर्ड पोर्टफोलिओमधील दोन लोकप्रिय ब्रँड जग्वार आणि लँड रोव्हर $2.3 बिलियनमध्ये विकत घेतले. तेव्हा फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड टाटांना म्हणाले होते की, तुम्ही हे ब्रँड्स खरेदी करून आमच्यावर मोठे उपकार करत आहात. टाटांनी काही काळातच या दोन ब्रँडचा व्यवसाय नफ्यात बदलला.
बिर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजीजचे चेअरमन वेदांत बिर्ला यांनी ट्विटरवर याबद्दल सांगितले होते. वेदांतपूर्वी, टाटा समूहाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान संपूर्ण कथा सांगितली होती. टाटा कॅपिटलचे प्रमुख प्रवीण कडले यांच्या म्हणण्यानुसार, 1999 मध्ये अमेरिकेतील डेट्रॉईट येथे झालेल्या अपमानानंतर कंपनीची टीम त्याच संध्याकाळी न्यूयॉर्कला परतली. टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा त्या तेव्हा खूप नैराश्यात होते. पण, काळाचे चक्र फिरले आणि टाटा पुन्हा यशस्वी झाले.