शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

Ratan Tata Nano EV: टाटा नॅनो इलेक्ट्रीकमध्ये येतेय? रतन टाटांचा कारसोबतचा फोटो; रेंजही तुफान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 5:19 PM

Ratan Tata with Nano EV: रतन टाटांच्या कंपनीने ही कार ईलेक्ट्रीकमध्ये तयार केली आहे. या कारमधून सैर करण्याचा मोह रतन टाटांनाही आवरला नाही. 

टाटा मोटर्स (Tata Motors) ची सर्वात छोटी कार टाटा नॅनो हे रतन टाटांचे स्वप्न होते. ही कार रस्त्यावर आली परंतू काही वर्षांतच ती बंदही झाली. लोकांनी या कारला फारसा प्रतिसाद दिला नाही. गेल्या दोन वर्षांपासून टाटा नॅनोच्या केवळ एक दोनच कार बनल्या आहेत. असे असले तरी टाटा उमेद हरलेले नाहीत. रतन टाटांच्या कंपनीने ही कार ईलेक्ट्रीकमध्ये तयार केली आहे. या कारमधून सैर करण्याचा मोह रतन टाटांनाही आवरला नाही. 

टाटा नॅनो ईव्ही रतन टाटांना देण्यात आली. तेव्हा टाटा यांनी त्यामधून प्रवास केला. इलेक्ट्रीक व्हेईकल्ससाठी पावरट्रेन बनविणारी कंपनी इलेक्ट्रा ईव्ही (Electra EV) या टाटा नॅनोला कस्टमाईज केले आहे. टाटा नॅनोला ईव्ही कारचे रुप दिले आहे. Electra EV ने याची माहिती LinkedIn वर दिली. रतन टाटांना ही कार केवळ आवडलीच नाही, तर त्यांनी या कारमधून सैरही केली. रतन टाटांना 72V Nano EV देण्यात आली आहे. त्यांच्याकडून मिळालेला फिडबॅक हा सुपर प्राऊड आहे, असे कंपनीने म्हटले आहे. 

Tata Nano EV ची वैशिष्ट्येनॅनो ईव्ही ही 4 सीटर कार आहे. ही कार 10 सेकंदांपेक्षा कमी वेळेत शून्य ते 60 किमी प्रतितास वेग वाढवते. यामध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. या कारबद्दल टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की, यामुळे कारचा खरा अनुभव येतो. ग्राहकांना इको-फ्रेंडली व खासगी वाहतूक प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नात कोणतीही तडजोड केलेली नाही.

213 किमीची रेंजया कस्टम बिल्ट नॅनो ईव्हीमध्ये 72V आर्किटेक्चर वापरण्यात आले आहे. टिगोर ईव्हीमध्येही हीच पॉवरट्रेन वापरली गेली आहे. कंपनीने त्याच्या डिझाइनमध्ये काही बदल केले आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) द्वारे प्रमाणित 213 किमीची रेंज गाठली. असे करताना कंपनीने पॉवरट्रेनमध्ये कोणतेही भौतिक बदल केले नाहीत.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर