शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कारमधील बकेट सीट आरामदायी खरी पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 10:06 PM

कारमध्ये सध्या दिल्या जाणा-या बकेट्स सीट्समुळे आरामदायीपणा वाढला आहे. मात्र ड्रायव्हरच्या दृष्टीने ते किती उपयुक्त आहे, याचा विचार केला गेला पाहिजे.

कारमध्ये सध्या दिल्या जाणा-या बकेट्स सीट्समुळे आरामदायीपणा वाढला आहे. मात्र ड्रायव्हरच्या दृष्टीने ते किती उपयुक्त आहे, याचा विचार केला गेला पाहिजे. आपल्याला मोटारीमध्ये बसण्यासाठी जास्तीत जास्त आरामदायी सीट कशी मिळेल, त्याच्या शोधात अनेक जण असतात. कारमधील सीटमध्ये विविध पद्धतीच्या सीट्सचे प्रकार कार उत्पादकांनी आतापर्यंत सादर केलेले आहेत. कारमधील चांगली सीट म्हणजे नेमके काय, असाही प्रश्न अनेकांना पडतो. मऊशार सीट्स, स्प्रिंगच्या सीट्स या जास्त आरामदायी वाटतात. पण त्याही पेक्षा सीट्सची रचना पाठीला दिलेला विशेष बाक व कोन हा देशील महत्त्वाचा भाग असतो. सीट्स कव्हर किती छान आहे, त्यावर सीट्सचा आरामदायीपणा अवलंबून नसतो. काही वेळा अगदी स्तानिक स्तरावरही सीट्स तयार करणारे तुमच्या कारसाठीच नव्हे तर अगदी रिक्षासाठीही इतकी छान सीट तयार करतात की तुम्हाला रिक्षामध्ये बसल्यानंतरही कारमध्ये बसल्याचे सुख मिळते. कारमध्ये सध्या बकेट सीट्सचा प्रभाव जास्त आहे. बकेट सीट म्हणजे काहीशी खोलगट असणारी व दोन्ही बाजून हात सामावून त्यांना आराम देणारी एक रचना आहे. यामुळे तुमच्या मांड्यांनाही आराम चागला मिळतो. लांबच्या प्रवासात या बकेट सीट्स खूप आरामदायी असतात, यात शंकाच नाही.सीट्स केवळ मागे बसणाऱ्यांनाच नव्हे तर कार चालकाच्यादृष्टीनेही त्य़ा कारच्या रचनेनुसार तयार करायला हव्यात. वास्तविक कार चालकाच्या सीट्ची रचना ही अधिक सयुक्तिक व आरामदायीपणापेक्षा ड्रायव्हिंगसाठी उपयुक्त हवी. अनेकदा तसे होत नाही, अर्थात मग त्यासाठी सीट वर खाली घेण्याची सोय दिली जाते. तसेच पाठ पुढे मागे करणे हे बहुतांशी मोटारींच्या ड्रायव्हर सीटला देण्यात आलेलेल आहे. कारची रचना व ड्रायव्हरची सीट यांच्यामध्ये एक तार्किकता हवी. ड्रायव्हिंग करताना मान वर करावी लागण्याची गरज ड्रायव्हरला पडू नये,बकेट सीटमध्ये असणारा आरामदायीपणा काहीवेळा ड्रायव्हरला झोप येण्यासाठीही कारणीभूत ठरतो. त्याच्या मांड्या या रिलॅक्स झालेल्या असल्याने लांबच्या प्रवासात त्यामुळे एक प्रकारचे शैथिल्य ड्रायव्हरला येऊ शकते. मात्र ही बाब फार विचारात घेतलेली दिसत नाही. त्यामुळे अपघातजन्य स्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी ड्रायव्हरच्या सीटवरील व्यक्तीने आपल्या उंचीनुसार सीट जुळवून घेतली पाहिजे. तसेच पाठीची रचना मध्ये मध्ये बदलत ठेवली पाहिजे. त्यामुळे त्याला अशा प्रकारचे शैशिल्य येण्याची शक्यता राहाणार नाही.बकेट सीटस या पुढील बाजूला ड्रायव्हर व त्याच्याबाजूला बसणाऱ्या व्यक्तीसाठी स्वतंत्र असतात. बेंच सीटप्रमाणे त्यांचे आसन व पाठ सलग नसते. पूर्वीच्या अ‍ॅम्बेसेडर वा प्रीमियर या गाड्यांना बेंच सीट्स दिलेल्या आहेत. काही एसयूव्ही प्रकारातील काड्यांनाही या बेंच सीट्स दिलेल्या आहेत. मात्र या सीट्समध्ये केवळ पुढील बाजूला चालकासह तीन जण बसण्याची क्षमता तयार केलेली आहे. अशामुळे चालकाला स्वातंत्र्य किती मिळेल, असाही काहींना प्रश्न पडतो. तसेच या पद्धतीच्या आसनामुळे सध्याच्या कारना असलेली रूंदी विचारात घेता फ्लोअर गीअरना वाव नसतो. हातला ला ज्या पद्धतींची हालचाल करावी लागते, त्यासाठी स्वतंत्र सीट्स असणे हे गरजेचे आहे. बकेट्स सीट या स्वतंत्र असल्याने ड्रायव्हिंग करणाऱ्याला मिळणारी मुक्तता ही गरजेची असते. लांबच्या प्रवासामध्ये त्यामुळे तशा सीट्स खूप उपयुक्त असतात. बकेट सीट्सची रचना पाहाता पुटक्या व्यक्तीला मात्र उशी ठेवून सीट्सची उंची वाढवायची वेळ येते. अशा सीट्सची सध्याची आरामदायी गरज म्हणून पाहिले तरी ड्रायव्हरच्या सीटमध्ये नक्कीच अनेक सुधारणा केल्या जाण्याची आवश्यकता नक्कीच आहे.

टॅग्स :carकार