मुंबई : भारतातील युरोपियन ऑटोमोटिव्ह ब्रँड असलेल्या रेनॉल्टने 'रेनॉल्ट समर कॅम्प' हा देशव्यापी उपक्रम सुरु केला आहे. हे शिबीर 24 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत सर्व रेनॉल्ट सर्व्हिस सेंटरवर आयोजित केले गेले आहे.
कारची चांगली देखरेख हे सर्व्हिसिंग कॅम्प आयोजित करण्याचे मुख्य ध्येय आहे. वाहनांकडे प्रशिक्षित आणि कुशल सेवा तंत्रज्ञांकडून तज्ञांचे लक्ष दिले जाईल. रेनॉल्ट इंडियाने ठरवलेल्या नियमांनुसार, रेनॉल्ट समर कॅम्प रेनॉल्ट कार मालकांसाठी मोफत कार टॉप वॉशसह संपूर्ण कारची तपासणी करेल. कारच्या सर्व भागांचे बारकाईने पाहणी केली जाईल. अशा नियमित तपासणीमुळे वाहनांच्या सुस्थितीत चालत राहण्याचा विश्वास मिळतो. यामुळे ग्राहकांना मालकीचा समाधानकारक अनुभव मिळतो.
रेनॉल्ट समर कॅम्पचा एक भाग म्हणून, रेनॉल्ट इंडियाचे ग्राहक इंजिन ऑइल रिप्लेसमेंटवर 25% पर्यंत सूट, निवडक भाग आणि अॅक्सेसरीजवर 10% आकर्षक सवलत, 15% लेबर चार्जेसचा लाभ घेऊ शकतात. रेनॉल्ट इंडिया विस्तारित वॉरंटी आणि रोड-साइड असिस्टन्स प्रोग्रामवर 10% सूट देखील देईल.
सध्या रेनॉल्ट इंडियाचे देशभरात जवळपास 500 विक्री आणि 530 सर्व्हिस सेंटर आहेत. कार चेक-अप सुविधांसोबतच टायर्सवरील विशेष ऑफर (निवडक ब्रँड) सारख्या अनेक मूल्यवर्धित फायद्यांसोबतच, ग्राहकांसाठी खात्रीशीर भेटवस्तूंसह अनेक मनोरंजक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. ज्यामुळे ग्राहकांसाठी हा एक रोमांचक आणि आनंददायक अनुभव मिळेल.