फ्रेंच ऑटोमेकर रेनॉल्ट (Renault)ने आपल्या नवीन डस्टर एसयूव्हीवर (Duster SUV) काम सुरू केले आहे. ही नवीन गाडी 2024-25 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च केली जाईल. Renault ने भारतीय बाजारात बाजारात 2013 मध्ये पहिली जनरेशन डस्टर लॉन्च केली होती, जी 2020 मध्ये बंद करण्यात आली. कंपनी निवडक आंतरराष्ट्रीय बाजारात सेकंड जनरेशन डस्टरची विक्री करत आहे, मात्र हे मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले नाही.
आता नवीन 3rd जनरेशन रेनॉल्ट डस्टरचे उत्पादन स्थानिक पातळीवर सुरू होईल आणि आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतात लॉन्च केले जाईल. नवीन Renault Duster स्थानिक CMF-B मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, जे Renault आणि Nissan मधील अनेक प्रोडक्टचा आधार आहे. नवीन रेनॉल्ट डस्टर आकाराने मोठी असेल. Creta आणि Alcazar प्रमाणे, Renault नवीन डस्टर दोन सीटिंग लेआउटमध्ये लॉन्च करेल. एक 5-सीटर आणि दुसरी 7-सीटर. 5-सीटर मॉडेलची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, VW Taigun, Skoda Kushaq आणि MG Astor यांच्याशी होईल. तर, डेरिव्हेटिव्ह मॉडेल Tata Safari, Mahindra XUV700 आणि Hyundai Alcazar च्या बरोबरीत असेल.
रेनॉल्ट-निसान CMF-B प्लॅटफॉर्मचे स्थानिकीकरण होण्यास वेळ लागेल. हे प्लॅटफॉर्म फ्यूचर-प्रूफ असेल आणि सध्याच्या सेफ्टी स्टँडर्ड्ससह असेल. ही हायब्रिड आणि ईव्ही पॉवरट्रेनसह इलेक्ट्रिक पॉवरट्रेनलाही सपोर्ट करेल. रेनॉल्ट सध्या भारतात अरकाना कूप क्रॉसओव्हरची टेस्टिंग करत आहे. कंपनी 2023 मध्ये भारतीय बाजारात क्रॉसओव्हर लॉन्च करणार आहे. रेनॉल्टने क्विड इलेक्ट्रिकदेखील लॉन्च करण्याची योजना आखली आहे.