इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी Revos ने दिवाळीच्या मोसमात एक जबरदस्त ऑफर लाँच केली आहे. यामध्ये कंपनी आपला ईव्ही चार्जिंग पॉइंट फक्त 1 रुपयात देत आहे. कोणीही व्यक्ती हा चार्जर आपल्या घर-दुकानाला लावून पैसे कमवू शकणार आहे.
Revos कंपनीने जगातील सर्वात मोठे पीअर-2-पीअर चार्जिंग नेटवर्क उभारण्याची योजना जाहीर केली आहे. यामध्ये कंपनी आपल्या युनिव्हर्सल बोल्ट ईव्ही चार्जर (Bolt EV Charger) आणि बोल्ट ऑपरेटिंग सिस्टमचे नेटवर्क तयार करेल. पोर्टेबल असण्यासोबतच कंपनीचे हे चार्जर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी उपयुक्त ठरतील.
दिवाळीनिमित्त कंपनीने आपल्या बोल्ट ईव्ही चार्जरची प्रास्ताविक किंमत फक्त 1 रुपये ठेवली आहे. 29 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान हा EV चार्जर खरेदी केला तर त्याला फक्त 1 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर कंपनी हा चार्जर 3,000 रुपयांना विकणार आहे.
या चार्जरची खास बाब म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळे इलेक्ट्रिकल फिटिंग करण्याची गरज नाही. सध्याच्या घरांच्या एसी लाइट फिटिंग किंवा व्यावसायिक दुकानांच्या लाईट फिटिंगसोबत काम करू शकतो. हा चार्ज इन्स्टॉल करण्यासाठी देखील फक्त 30 मिनिटे लागतात.
वीज बिल किती येणार...हा चार्जिंग पॉइंट बसवल्याने किती वीज बिल येईल हे सांगण्यासाठी त्यात एनर्जी कॅल्क्युलेटर बसवण्यात आला आहे. तुम्हाला हा चार्जिंग पॉइंट 'खाजगी' किंवा 'सार्वजनिक' कारणासाठी वापरायचा आहे, त्यात एक स्विच आहे ज्यानुसार ते दोन्ही मोडमध्ये ऊर्जा वापर मोजणार आहे. त्यापद्धतीने तुम्ही वाहन चार्ज करणाऱ्या ग्राहकाकडून पैसे घेऊ शकणार आहात. कंपनी देशात असे एक लाख चार्जर लावणार आहे.