फ्रान्सची मुख्य वाहन निर्माता कंपनी भारतात पाय पसरविण्याचा प्रयत्न करत आहे. थोड्या थोड्या अंतराने या कंपनीने चौथी कार भारतीय बाजारात लाँच केली आहे. ती देखील क्रेटाला टक्कर देण्यासाठी. Citroen ने C3 Aircross एसयुव्ही आज लाँच केली. कंपनीने आज फक्त बेस व्हेरिअंट लाँच केले आहे. मिड आणि टॉप व्हेरिअंट काही काळाने लाँच केले जाणार आहे.
Citroen C3 Review: सिट्रॉइन C3 रिव्ह्यू: सात लाखांत एसयुव्हीची मजा की सजा? नवा पर्याय वापरायचा की...सिट्रॉएनने या एसयुव्हीचे अधिकृत बुकिंग सुरु केले आहे. यासाठी २५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. या बेस व्हेरिअंटची किंमत कंपनीने 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. अन्य दोन व्हेरिअंट प्लस आणि मॅक्सच्या किंमती जाहीर केलेल्या नाहीत. या कारची डिलिव्हरी १५ ऑक्टोबरपासून सुरु केली जाणार आहे.
सिट्रॉएन या कारद्वारे किया सेल्टॉस आणि ह्युंदाई क्रेटाला टक्कर देणार आहे. या दोन्ही कारच्या किंमतींमध्ये १० ते १३ हजारांचा फरक आहे. C3 Aircross मध्ये कंपनीने 17 इंचाचे अलॉय व्हील दिले आहेत. तसेच या कारमध्ये सात सीटर पर्यायही मिळणार आहे. या सात सीट मॅक्समध्ये मिळणार आहेत.
Citroen C3 Aircross च्या बेस व्हेरिअंटमध्ये एअरबॅग, ईबीडी. एबीएस, ईएससी, हिल होल्ड असिस्ट, टीपीएमएस आणि रिव्हर्स पार्किंग सेंसरसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने या SUV मध्ये 1.2 लिटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे जे 109Bhp पॉवर आणि 190Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. मायलेजबाबत अद्याप माहिती मिळालेली नाहीय.